उसाचा रस यकृत डिटॉक्स करण्यास मदत करतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक यकृतातील संसर्ग दूर करतात.
यकृत निकामी झाल्यामुळे कावीळ होते. काविळीमध्ये उसाचा रस खूप फायदेशीर आहे.
उसाचा रस किडनी तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. उसाचा रस विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि मूत्रपिंडाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतो.
उसाच्या रसात पोटॅशियम खूप जास्त असते. यामुळे पोटाची पीएच पातळी कायम राहते.
उसामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते. जे आतडे स्वच्छ करून बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.
उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.
उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. यामुळे दातांना होणाऱ्या इनफेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.
उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहांनांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात.