तुम्हाला माहितीये वडा-पावचा इतिहास? कसा लागला शोध? जाणून घ्या!
मुंबई म्हटलं की आपल्याला खाण्याच्या दृष्टीने वडा-पाव आठवतो. मुंबई वडा-पावसाठी देशभर प्रसिद्ध आहे.
वडा-पावचा शोध सुमारे 56 वर्षांपूर्वी लागला असे मानले जाते. अशोक वैद्य नावाच्या व्यक्तीने 1966 मध्ये वडा-पावचा शोध लावला आणि दादर स्टेशनवर त्यांनी पहिला वडा-पाव स्टॉल लावला.
1970 आणि 80 च्या दशकातील संपानंतर कापड गिरण्या अखेर बंद पडल्या त्यानंतर शिवसेना संस्थापक बाळ ठाकरे यांनी जनतेला काही काम करून उदरनिर्वाह करण्याचे आवाहन केले.
बाळ ठाकरे यांच्या प्रेरणेने अशोक वैद्य यांनी वडा-पाव विकायला सुरुवात केली. पूर्वी अशोक वैद्य फक्त वडा विकायचे. पण, त्यासोबत काहीतरी नवीन का करू नये, असा विचार त्यांनी केला.
अशा परिस्थितीत पावासोबत वडा आणि बटाटा विकण्याचा विचार केला आणि नंतर पावाच्या मधोमध वडा ठेऊन वडा विकण्यास सुरुवात केली.
वडा-पावला खास चव देण्यासाठी अशोक वैद्य यांनी मिरची, लसूण, खोबरे आणि शेंगदाणे यांची चटणीही बनवली, ज्यामुळे वडापावची चव अजून भारी झाली.