Ghee Side Effect : तुम्हाला माहितीयेत तूप खाण्याचे तोटे? जाणून घ्या!

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये अनेक प्रकारची तेल आणि मसाले वापरले जातात. देशी तूप हा देखील आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.

आयुर्वेदानुसार तुपात अनेक औषधी गुणधर्म आहेत. आरोग्यासाठी फायदे देण्यासोबतच तूप जेवणाची चवही वाढवते.

पण तुम्हाला माहित आहे का की आरोग्यासाठी फायदेशीर असलेले तूप कधी कधी आपल्यासाठी हानिकारक ठरते. 

जाणून घ्या तूप खाण्याचे तोटे

Arrow

पचन समस्या

जर तुम्हाला पचनाचा त्रास  होत असेल तर तुम्ही चुकूनही तूप वापरू नका.

लिव्हर सिरॉसिस

तुम्ही जरी लिव्हर सिरोसिसच्या समस्येने त्रस्त असाल तरी तुम्ही तूप खाणे टाळावे. या प्रकारात तुपाचे सेवन केल्याने तुमची समस्या आणखी वाढू शकते.

हंगामी तापामध्ये  तूप खाणे हानिकारक असते 

 तूप खोकला वाढवण्याचे काम करते. अशा स्थितीत ताप असताना तुपापासून दूर राहणे चांगले. विशेषत: हंगामी तापात चुकूनही तूप वापरू नका.

हिपॅटायटीस

जर तुम्हाला हिपॅटायटीसचा त्रास होत असेल तर तूप खाल्ल्याने तुमची प्रकृती बिघडू शकते. या अवस्थेत यकृतामध्ये जळजळ झाल्यामुळे ते जड पदार्थ पचवू शकत नाही.

गर्भधारणा आणि कोलेस्ट्रॉल

तुम्ही गरोदर असाल तर सुरुवातीच्या काही महिन्यांत तूप खाणेही टाळावे. खरे तर सुरुवातीला तूप खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते. तसेच, जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तूप वापरू नका. यामुळे शरीरातील सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी