Sharad Pawar : राजकारणातील चाणक्य, क्रिकेटमधील बादशाह...शरद पवार!

१२ डिसेंबर १९४० रोजी गोविंदराव आणि शारदाबाईंच्या पोटी जन्मलेल्या शरद पवार यांनी १९५८ ते २०२३ या काळात सर्व राजकीय पायऱ्या चढल्या.

शरद पवारांनी १९६७ मध्ये पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी होऊन आमदार झाले.

१९७८ मध्ये देशात आणीबाणीनंतर पवारांनी इंदिरा गांधींविरुद्ध बंड केले आणि काँग्रेस सोडले आणि जनता पक्षासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि राज्याचे मुख्यमंत्री बनले 

१९८७ मध्ये शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसविरोधात बंड केले आणि १९९९ मध्ये पीएम संगमा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

शरद पवार विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत. 

शरद पवार राजकारणातील चाणक्य असण्याबरोबरच क्रिकेटमधील 'बादशाह'ही राहिले. पवार यांनी २००५ ते २००८ पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष आणि २०१० ते २०१२ पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी