Indian Railways : प्लॅटफॉर्म तिकीट किती तासांसाठी असतं? जाणून घ्या नाहीतर...

दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, प्लॅटफॉर्मवर फक्त प्रवासीच जाऊ शकतात, तेही वैध तिकीट घेऊन. 

पण असे लोकही प्लॅटफॉर्मवर फिरत राहतात, ज्यांना प्रवास करायचा नाही. अशा स्थितीत स्थानकावरील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचा नियम केला. 

जर कोणी आपल्या नातेवाईकाला स्टेशनवर सोडण्यासाठी आले असेल तर अशा लोकांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागते.

तुम्ही प्लॅटफॉर्मवर प्रवासाच्या तिकीटाशिवाय किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट नसताना पकडले गेल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. पण, हे प्लॅटफॉर्म तिकीट किती काळ वैध आहे हे तुम्हाला माहिती आहे का? 

एकदा हे तिकीट खरेदी केल्यावर कोणीही दिवसभर प्लॅटफॉर्मवर राहू शकतो का?

रेल्वे वेबसाइट erail.in नुसार, 10 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन कोणीही व्यक्ती दिवसभर प्लॅटफॉर्मवर थांबू शकत नाही. प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता फक्त दोन तासांची आहे. म्हणजेच एकदा तिकिट खरेदी केल्यानंतर ते दोन तासांसाठीच वापरता येते. दोन तास उलटून गेल्यानंतरही प्लॅटफॉर्मवर थांबल्यास पकडले गेल्यावर  दंड भरावा लागू शकतो.

तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करायला विसरल्यास, रेल्वे तिकीट तपासणारे कर्मचारी तुम्हाला किमान 250 रुपयांचा दंड करू शकतात. इतकेच नाही तर प्लॅटफॉर्मवर विनातिकीट पकडलेल्या व्यक्तीकडून त्या प्लॅटफॉर्मवरून निघालेल्या आधीच्या ट्रेनच्या किंवा त्या प्लॅटफॉर्मवर आलेल्या ट्रेनच्या दुप्पट भाडेही आर्थिक दंड म्हणून वसूल केले जाऊ शकते.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी