Pineapple Benefits : कॅन्सरशी लढण्याचं बळ देतं अननस! वाचा त्याचे जबरदस्त फायदे

अननस हे एक रसाळ फळ आहे. ज्याची आंबट-गोड चव आईस्क्रीमपासून ते डेझर्टमध्ये अनेक लोकांना आवडते. पण हे फळ केवळ चव आणि वासामुळे आवडत नाही तर हे एक अतिशय आरोग्यदायी फळ आहे.

अननसात व्हिटॅमिन सी तसेच व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन, तांबे, लोह, पोटॅशियम, पोटॅशियम, फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याचा आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात.

विशेषत: अननस मांस पचण्यास मदत करते. जर तुमची पचनक्रिया खराब असेल तर आहारात अननसाचा समावेश करा.

अननस मांस पचण्यास मदत करते 

अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते, जे प्रथिने पचवते. मांस मऊ करण्याबरोबरच, अननस त्यामधील प्रथिने तोडण्यास आणि ते पचण्यास मदत करते. म्हणूनच अननस खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि त्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

सांधेदुखी कमी होण्यास मदत होते

अननसमध्ये दाहक-विरोधी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आढळतात. ज्यामुळे सांधेदुखी, ऑस्टिओपोरोसिस कमी होण्यास मदत होते.

संसर्गापासून संरक्षण होते

अननसातील दाहक-विरोधी गुणधर्म सायनुसायटिस, दुखापत किंवा जळल्यानंतर संसर्ग टाळण्यास मदत करतात.

फुफ्फुसांना डिटॉक्स करतो 

अननसाचा रस फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठी वापरला जातो.

कर्करोगापासून संरक्षण करतो

धूम्रपान, तंबाखूमुळे शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात. अननसात असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक अॅसिड हे अँटी-ऑक्सिडंट असतात जे पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात.

मसल्स रिकवर होण्यास मदत होते 

अननस व्यायामानंतर स्नायूंच्या वेदना कमी करते. यामुळे मसल्स रिकवर होण्यास मदत होते.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी