फायद्याची माहिती! अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी 'या' गोष्टींचं सेवन करा!

रक्तामुळे शरीरातील सर्व अवयवांचे कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत होते. संपूर्ण शरीरात रक्त संचारते. त्यामुळे सर्व मज्जासंस्था आणि पेशींना आवश्यक पोषण मिळते. रक्तात विरघळलेला ऑक्सिजन चरबी, हार्मोन्स, साखर आणि सर्व गोष्टी शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचवतो.

परंतु खराब आहार आणि जीवनशैलीमुळे रक्तामध्ये अशुद्धता निर्माण होते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. अशुद्ध रक्तामुळे ऍलर्जी, खाज सुटणे अशा त्वचेच्या समस्या  सुरू होतात.

अशा परिस्थितीत पुढील पदार्थ खाल्ल्याने अशुद्ध रक्त शुद्ध होऊ शकते.

गूळ

गूळ हा नैसर्गिक रक्त शुद्ध करणारा पदार्थ मनाला जातो . बद्धकोष्ठतेपासून, गूळ यकृताचे योग्य कार्य करण्यास मदत करते. त्यामुळे सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. गुळात लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते. रोज एक गुळ खाल्ल्यास शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो.

बीटरूट

दररोज बीटरूटचा रस प्यायल्याने शरीरात नवीन रक्त तयार होते. तसेच यामध्ये असलेले बीटासायनिन्स रक्त शुद्ध करण्यात मदत करतात. बीटरूट सॅलड म्हणूनही खाऊ शकतो. 

हळद

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन कंपाऊंड हे जीवाणूविरोधी आहे. जे घाणेरडे बॅक्टेरिया काढून टाकतात. हळदीचे दूध किंवा पाण्यात हळद मिसळून रोज प्यायल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

तुळस

तुळशीची पाने रोज रिकाम्या पोटी चघळल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. आपण तुळशीच्या पानांचा चहा देखील पिऊ शकता. तुळशीच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात ऑक्सिजन असते ज्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते.

कडुलिंब

रक्ताच्या अशुद्धतेमुळे चेहऱ्यावर मुरुम येतात. आणि त्वचेवर खाज सुटणे, पुरळ उठणे असे प्रकार होतात. त्यामुळे रोज रिकाम्या पोटी काही कडुलिंबाची पाने चावल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल घटक रक्त चांगले शुद्ध करतात.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी