Health : पपई खाल्ल्यानंतर चुकूनही 'या' 5 गोष्टींचे सेवन करू नका!

चेहर्‍याची चमक वाढवणे असो किंवा पचनक्रिया चांगली असो, पपई हा प्रत्येक समस्येवर इलाज मानला जातो. पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ए यासारखे पोषक तत्व नकळत आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. 

आरोग्यासाठी इतकं फायदेशीर असूनही तुम्हाला माहीत आहे का पपई खाण्याची योग्य पद्धत जर  तुम्हाला माहीत नसेल तर ते तुमच्या आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचवू शकते.

आयुर्वेदानुसार पपई खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाण्यास मनाई आहे. चला अशाच 5 गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या पपई खाल्ल्यानंतर टाळल्या पाहिजेत.

थंड पाणी-

पपई खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. पपई खाल्ल्यानंतर चांगले पचन होण्यासाठी थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

दुग्ध उत्पादने-

पपईसोबत दूध, चीज, लोणी किंवा दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने पचनास त्रास होऊ शकतो आणि पोटात पेटके येऊ शकतात. पपईमध्ये असलेले काही एन्झाईम्स या दुग्धजन्य पदार्थांच्या पचनात अडथळे आणून तुम्हाला अस्वस्थ करू शकतात.

काकडी-

पपईसोबत काकडी खाल्ल्याने पोट फुगणे, पोटदुखी आणि अतिसार यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

आम्लयुक्त पदार्थ-

संत्री, द्राक्षे, लिंबू, टोमॅटो यांसारख्या आम्लयुक्त पदार्थांसोबत पपई खाणे हानिकारक ठरू शकते. असे केल्याने तुम्हाला छातीत जळजळ, ऍसिड रिफ्लक्स किंवा इतर पचन समस्या येऊ शकतात.

अंडी-

पपई खाल्ल्यानंतर चुकूनही अंडी खाऊ नका. दोन्ही एकत्र सेवन केल्याने अपचन, मळमळ, बद्धकोष्ठता आणि उलट्या इत्यादी पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी