ताडगोळे भारीच असतात! उन्हाळ्यात ठरतं सुपरफूड, जाणून घ्या त्याचे फायदे 

तुम्ही उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, काकडी, लिची, आंबा भरपूर खात असाल, पण तुम्ही कधी ताडगोळा खाल्ले आहे का? तुम्ही याचे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल, पण ताडगोळा उन्हाळ्यात तुम्हाला निरोगी ठेवतो. ते पूर्णपणे पारदर्शक जेलीसारखे दिसते आणि चवीला किंचित गोड असते.

चला तर मग जाणून घेऊया ताडगोळा खाण्याचे फायदे.

ताडगोळा खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. 

उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने शरीरात पाण्याची कमतरता असते. यामुळे तुम्ही डिहायड्रेशनचे शिकार होऊ शकता. ताडगोळ्याचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते तसेच शरीराला थंडावा जाणवतो. 

ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते जे अॅसिडिटी कमी करण्यासाठी  फायदेशीर असते. व्हिटॅमिन बी12 शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे पचनशक्ती मजबूत होते. पोटाशी संबंधित समस्या जसे गॅस, जळजळ, पोटदुखी यापासून आराम मिळतो.

कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडल्यास त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. त्वचेवर पुरळ उठणे, जळजळ होणे, खाज सुटणे, फोड येणे आणि लाल पुरळ उठणे. या समस्यांवर मात करण्यासाठी ताडगोळा रस चेहऱ्यावर लावा. रसात चंदन पावडर घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा चेहऱ्यावर ग्लो येईल.

ताडगोळ्यामध्ये जास्त कॅलरी असल्यामुळे  थकवा दूर होतो.

गर्भवती महिलांना पोटाशी संबंधित समस्या किंवा बद्धकोष्ठता असल्यास त्यांनी ताडगोळ्याचा आहारात समावेश करावा. 

ताडगोळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने यकृत साफ करण्यास आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. मासिक पाळीत पांढर्‍या स्रावाची समस्या वाढते. ही समस्या कमी करण्यासाठी ताडगोळा खा. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.

Face Wash Tips : चेहरा धुताना ‘या’ चुका अजिबात करू नयेत!