वयाचं नाही, विजयानं दिलं उत्तर! 21 वर्षाच्या मुलीनं मारली ग्रामपंचायत

WhatsApp Group

21 Year Old Sarpanch : एकेकाळी केवळ घरातील निर्णयांमध्ये सहभागी होणाऱ्या आणि शांत राहणाऱ्या मुली आता स्वतः निर्णय घेऊ लागल्या आहेत. आणि या बदलाचा ठोस पुरावा आहे, प्रियंका नेगी, जी केवळ 21२१ वर्षांची असूनही उत्तराखंडच्या गैरसैंण ब्लॉकमधील सारकोट गावाची नवनिर्वाचित सरपंच बनली आहे. तिची ही ऐतिहासिक निवड मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींनी दत्तक घेतलेल्या गावात झाली आहे, ज्यामुळे तिचा विजय अधिकच विशेष ठरतो.

सर्वात कमी वयाची सरपंच!

प्रियंका नेगी ही चमोली जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच ठरली आहे. ती राजकारण विषयात पदवीधर असून लहानपणापासूनच नेतृत्वगुण आणि सामाजिक भान असलेली व्यक्ती आहे. तिचे वडील, राजेंद्र नेगी, हे देखील दोन वेळा या गावचे सरपंच होते. त्यामुळे प्रियंका लहानपणापासूनच राजकारणाच्या आणि लोकसेवेच्या वातावरणात वाढली.

दत्तक गावात नेतृत्व मिळवणं ही सन्मानाची बाब

सारकोट हे गाव उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दत्तक घेतलेले असल्यामुळे इथं कोणतीही निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक नव्हे, तर राज्यस्तरावरील लक्ष वेधणारी बाब ठरते. अशा गावात एका केवळ 21 वर्षांच्या मुलीने सरपंचपद मिळवणं हे तिच्या मेहनतीचं आणि आत्मविश्वासाचं मूर्त स्वरूप आहे.

“ही माझी जबाबदारीची सुरुवात”

प्रियंका निवडून आल्यानंतर म्हणाली, “ही निवडणूक माझ्यासाठी सन्मानाची आहे, पण त्याहून अधिक ही जबाबदारीची सुरुवात आहे. गावातील प्रत्येक समस्येला माझ्या नेतृत्वात उत्तर मिळवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. माझं वय कमी असलं, तरी माझं ध्येय मोठं आहे.”

हेही वाचा – जवानीतच शरीराच्या नसांमध्ये ब्लॉकेज? यासाठी दररोज घ्या ‘ही’ २ घरगुती औषधं!

 गावकऱ्यांचा विश्वास, भविष्यातील आशा

गावकऱ्यांनी प्रियंका यांच्या विजयाचं भरभरून स्वागत केलं आहे. त्यांच्या मते, “इतक्या कमी वयात इतका संयम, विचार आणि नेतृत्व पाहायला मिळणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. ती गावात खूप सकारात्मक बदल घडवेल याची आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्री स्वतः गावाकडे लक्ष देत आहेत, त्यामुळे विकासाला वेग येईल.”

राजकारणात वडिलांचा अनुभव, घरातील लोकसेवेचं वातावरण आणि तिचं स्वतःचं शिक्षण, हे सगळं प्रियंकाच्या यशामागचं बळ आहे. ती गावातील गरजा समजून घेऊन, योजनाबद्ध काम करणार आहे. तिचं लक्ष पाणी, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवांसाठी रोजगारनिर्मिती यावर असणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment