अफगाणिस्तान हादरलं! 800 हून अधिक मृत, 2500 पेक्षा जास्त जखमी; महिलांना मदतीसाठी वाट बघावी लागली!

WhatsApp Group

Afghanistan Earthquake 2025 : अफगाणिस्तानमध्ये 1 सप्टेंबर रोजी रात्री 11:47 वाजता आलेल्या प्रचंड भूकंपामुळे देश हादरून गेला आहे. मृतांचा आकडा 800 च्या पुढे गेला असून, 2500 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अनेक गावं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.

तालिबान सरकारने ही माहिती दिली असून संयुक्त राष्ट्र (UN) आणि भारताने दु:ख व्यक्त करत मदतीचं आश्वासन दिलं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जलालाबादपासून 27 किमी उत्तर-पूर्वेकडे होता. कुनार प्रांतात सर्वाधिक हानी झाली असून, नूर गुल, सोकी, वातपुर, मनोगी आणि चापादारे या भागांतील शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

भूकंपाचे धक्के पाकिस्तान, उत्तर भारत आणि दिल्ली NCR पर्यंत जाणवले. त्यानंतर 4.7, 4.3, 5.0 आणि 5.0 तीव्रतेचे अनेक आफ्टरशॉक्स जाणवले. परिणामी भीतीचं वातावरण आणि नुकसान आणखी वाढलं.

हेही वाचा – तिरुपतीहून आलेल्या सोलापूरच्या कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू, सासू-सून आयसीयूमध्ये!

कुनारच्या तीन गावं पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याचं आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे. सरकारी प्रवक्त्यांनुसार अनेक कुटुंबं बेघर झाली असून, पक्की घरे नसल्यामुळे माती आणि दगडांची घरं कोसळून मोठी जीवितहानी झाली.

महिलांना आणि लहान मुलांना सर्वाधिक फटका

कुनारमधील पारंपरिक रूढीमुळे महिलांना तत्काळ उपचार मिळत नसल्याचं समोर आलं आहे. अनेक कुटुंबं महिलांना सकाळ होईपर्यंत हॉस्पिटलमध्ये नेत नव्हती. महिला बचावकर्मींचा अभावही या परिस्थितीत धोकादायक ठरतो आहे.

UN आणि मोदींनी दिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून अफगाणिस्तानातील लोकांप्रती संवेदना व्यक्त करत भारताकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. UN च्या रेस्क्यू टीम्स आधीपासून घटनास्थळी मदतीचं काम करत आहेत.

अफगाणिस्तानच्या हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये दरवर्षी भूकंप होतो. हे क्षेत्र टेक्टॉनिक प्लेट्सच्या जंक्शनवर असल्यामुळे ही स्थिती नेहमीच असते. shallow भूकंप अधिक विनाशकारी ठरतात कारण ते थेट जमिनीवर परिणाम करतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment