

Asia Cup 2023 : यावेळी आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात मुलतानमध्ये पाकिस्तान नेपाळशी खेळणार आहे. 19 दिवसांत एकूण 13 सामने खेळवले जातील. आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होतील. ही स्पर्धा दोन भागात खेळवली जाणार आहे. ग्रुप स्टेजनंतर सुपर-4 फेरी होईल.
यापूर्वी पाकिस्तानला आशिया चषकाचे यजमानपद मिळाले होते, मात्र भारताने तेथे खेळण्यास नकार दिल्यानंतर हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्यात आला. याअंतर्गत फायनलसह भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जातील. पाकिस्तानमध्ये एकूण 4 सामने खेळवले जाणार आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेत एकूण 9 सामने होणार आहेत. श्रीलंकेतील कॅंडी आणि कोलंबो येथे सामने खेळवले जातील, तर पाकिस्तानचे सामने मुलतान आणि लाहोरमध्ये होतील.
हेही वाचा – World Cup 2023 : भारतात येण्यापूर्वीच पाकिस्तानची हवा टाईट, संघासोबत आणणार मानसोपचारतज्ज्ञ!
यजमान पाकिस्तान ग्रुप स्टेजमध्ये घरच्या मैदानावर एकच सामना खेळणार असून लाहोरमध्ये सुपर फोर फेरीचा पहिला सामना खेळण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर यजमान श्रीलंका लाहोरमध्ये किमान एक सामना खेळणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. दोघांची पहिली टक्कर 2 सप्टेंबर रोजी कॅंडी येथे होईल. यानंतर, दोन्ही संघ सुपर-फोर फेरीत एकदा आमनेसामने येतील आणि जर ते अंतिम फेरीत पोहोचले तर 13 दिवसांच्या आत आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये 3 सामने खेळले जातील.
भारताचेे सामने
भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला कँडीत पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर 4 सप्टेंबरला ग्रुप स्टेजमध्ये नेपाळशी सामना होणार आहे. 10 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये सुपर-4 फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!