Bank Holidays : जुलै महिन्यात 15 दिवस बँका बंद! जाणून घ्या पूर्ण लिस्ट

WhatsApp Group

Bank Holidays : जून महिना संपला आणि आज जुलैचा पहिला दिवस. प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही बँकेत अनेक दिवस सुट्ट्या असतील. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. RBI च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, जुलै 2023 मध्ये बँका सुमारे 15 दिवस बंद राहतील.

ही यादी राष्ट्रीय स्तरावरील बँक सुट्ट्यांची आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांच्या दिवशीही बँका बंद असतात. या सुट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारचाही समावेश आहे. यापैकी आठ सुट्ट्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत सूचीबद्ध आहेत, तर उर्वरित आठवड्याच्या सुट्ट्या आहेत.

जर तुम्ही जुलैमध्ये बँकिंगशी संबंधित कोणत्याही कामासाठी शाखेत जाण्यासाठी घरातून निघाल तर प्रथम या दिवशी बँक सुरू आहे की नाही ते तपासा. त्यादिवशी ते बंद राहिल्यास तुमच्या बँकेशी संबंधित काम होणार नाही आणि तुमचा वेळही वाया जाईल. मात्र, या दिवशी बँकेच्या शाखा बंद राहतील मात्र मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहक ऑनलाइन माध्यमातून व्यवहार करू शकतात.

हेही वाचा – Hero कडून हजारो ग्राहकांना धक्का! बाईक-स्कुटरच्या किमती वाढवल्या; ‘या’ तारखेपासून…

जुलै 2023 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी येथे आहे. तुम्ही या महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी एकदा ही यादी जरूर पहा, जेणेकरून तुम्ही अनावश्यक काळजी करू नका आणि वेळ वाया घालवू नका.

  • 2 जुलै : रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
  • 5 जुलै : गुरू हरगोविंदजींच्या जयंतीनिमित्त श्रीनगर, जम्मूमध्ये बँका बंद राहतील.
  • 6 जुलै : एमएचआयपी दिनानिमित्त आयझॉलमध्ये बँका बंद राहतील.
  • 8 जुलै : महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
  • 9 जुलै : रविवारी देशभरात बँका बंद राहणार आहेत.
  • 11 जुलै : केर पूजेमुळे आगरतळामध्ये बँका बंद राहणार आहेत.
  • 13 जुलै : भानू जयंतीनिमित्त गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.
  • 16 जुलै : रविवारमुळे बंद राहणार आहे.
  • 17 जुलै: शिलाँगमध्ये यू तिरोट सिंग डेनिमित्त बँका बंद राहतील.
  • 21 जुलै: ड्रुकपा त्से-झीमुळे गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.
  • 22 जुलै : चौथा शनिवार
  • 23 जुलै : रविवारमुळे बंद राहणार आहे.
  • 28 जुलै : जम्मू आणि श्रीनगरमध्ये आशुरानिमित्त बँका बंद राहतील.
  • 29 जुलै 2023 : नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, भोपाळ, लखनऊ, आंध्र प्रदेश, हैदराबाद, तेलंगणा, रायपूर, जयपूर, कानपूर, नागपूर, बेलापूर, ऐझॉल, शिमला, पाटणा, आगरतळा मोहरमच्या निमित्ताने (ताजिया) रांचीमध्ये बँका बंद राहतील.
  • 30 जुलै : रविवारमुळे देशभरात बँका बंद राहणार आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment