बिटकॉइनमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करायचीये? दोनशे रुपयांत सुरू करता येईल!

WhatsApp Group

Bitcoin Investment India : ग्लोबल मार्केटमध्ये बिटकॉइनने $120,000 पार करत ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. यामुळे भारतातील अनेक नवखे गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीमध्ये नफा मिळवण्यासाठी स्वारस्य दाखवत आहेत. विशेष म्हणजे, बिटकॉइनमध्ये आता अगदी ₹200 पासूनही गुंतवणूक सुरू करता येते.

किती रकमेपासून सुरू करू शकतो गुंतवणूक?

CoinDCX चे सह-संस्थापक सुमित गुप्ता यांच्या मते, बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ₹200 पासून सुरुवात करता येते. 1 बिटकॉइनमध्ये तब्बल 10 कोटी ‘सतोशी’ असतात – म्हणजेच बिटकॉइनचा सर्वात छोटा युनिट. म्हणून पूर्ण बिटकॉइन खरेदी न करता तुम्ही त्याचा छोटा हिस्सा घेऊ शकता.

क्रिप्टो गुंतवणुकीचं योग्य नियोजन कसं कराल?

बिटकॉइन ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ‘डिजिटल गोल्ड’सारखी आहे. ही एसेट दीर्घकाळासाठी ठेवल्यास स्थिर नफा मिळू शकतो. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता समजून घ्या.

या आठवड्यातील क्रिप्टो अपडेट्स

या आठवड्यात स्टेबलकॉइन्स, मार्केट स्ट्रक्चर आणि अँटी-CBDC यासंदर्भात स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता असल्याने क्रिप्टोमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत.

भारतामधील क्रिप्टोचं भवितव्य काय?

भारतातील क्रिप्टो नियमावली अजूनही विकसित होत आहे. त्यामुळे अल्पकालीन हालचाली अनिश्चित असल्या तरी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक केल्यास धोका कमी होतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment