

Kanpur Son Kills Father : चित्रपट आणि क्राईम सीरिज पाहून गुन्हेगारीच्या जगात प्रेरणा घेण्याची एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका युवकाने ‘दृष्यम’ चित्रपट आणि ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेतील शक्कल लावत आपल्या वडिलांचा खून केला. या खुनामागे केवळ कौटुंबिक वैर नव्हे तर आर्थिक स्वार्थही असल्याचे तपासात उघड झाले आहे.
कटाची सुरुवात आणि ‘दृष्यम’ची प्रेरणा
62 वर्षीय कमलापती तिवारी हे पूर्वी बिहारमध्ये रेल्वेत गार्ड पदावर कार्यरत होते आणि निवृत्तीनंतर आपल्या पत्नीबरोबर वृंदावनमध्ये राहत होते. मुलं वेगवेगळ्या ठिकाणी राहायची. 15 मार्च 2025 रोजी ते कानपूरमधील ओल्ड शिवली रोडवरील घरी आले होते, पण त्यानंतर अचानक गायब झाले.
पत्नी मधु तिवारी यांनी 12 जून रोजी कल्याणपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की 18 मार्च रोजी औरैया जिल्ह्यातील एका कालव्यानजिक पेटवलेले वृद्धाचे शव सापडले होते. तपासात कळाले की, तो मृतदेह कमलापती तिवारी यांचाच होता.
थाना कल्याणपुर, कानपुर नगर में दिनांक 12 जून 2025 को श्री कमलापति तिवारी (सेवानिवृत्त रेलवे गार्ड) की पत्नी द्वारा अपने पति की गुमशुदगी दर्ज कराई गई थी।
— POLICE COMMISSIONERATE KANPUR NAGAR (@kanpurnagarpol) September 19, 2025
गंभीर प्रकरण होने के कारण थाना कल्याणपुर पुलिस टीम एवं सर्विलांस टीम द्वारा संयुक्त रूप से जांच/सघन प्रयास किए गए। घटना के… pic.twitter.com/wUHK4O7Up5
हेही वाचा – पासपोर्ट झाला स्मार्ट! ई-पासपोर्टमुळे भारतीयांना होणार 5 मोठे फायदे – माहिती वाचून तुम्हीही म्हणाल ‘वा!’
मोबाईलचे लोकेशन बिहारमध्ये – पोलीस देखील चकित
कमलापती तिवारी यांचा मोबाईल फोन बिहारमधील जयनगर येथे शेवटचा सक्रिय होता. ही शक्कल आरोपी मुलगा रामजी तिवारी याने मुद्दाम रचली होती. त्याने आपल्या मित्र ऋषभ शुक्लाला वडिलांचा मोबाईल बिहारला नेऊन चालू करून पुन्हा बंद करण्यास सांगितले. त्यानंतर तो फोन चक्क नेपाळमध्ये विकण्याच्या हेतूने परत आला आणि याचमुळे पोलिसांचा संशय वाढला.
मोबाईलने फोडला भांडाफोड
मोबाईल पोलिसांच्या हाती लागल्यावर 19 सप्टेंबर रोजी दोघांना अटक करण्यात आली. कडक चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, कमलापती तिवारी यांच्याकडे आठ दुकाने होती आणि नियमित पेन्शन येत होती. मात्र, ते आपल्या मुलांना आर्थिक मदत करत नव्हते.
यामुळेच मुलगा रामजी नाराज होता आणि आपल्या मित्रासोबत मिळून हत्या करण्याचा कट रचला. त्यांनी ‘दृष्यम’ आणि ‘क्राईम पेट्रोल’ पाहून पुरावे लपवण्याच्या क्लृप्त्या शिकल्या होत्या.
कौटुंबिक फूट आणि संपत्तीचा लोभ – हत्येचं कारण?
कमलापती यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. त्यांचा एक मुलगा शिक्षक आहे आणि कानपूरमध्ये राहतो, तर मुलगी ओडिशात विवाहित आहे. हे कुटुंब पहिले पाहता शांत दिसणारे, मध्यमवर्गीय वाटत होते. पण संपत्ती, दुर्लक्ष आणि वैर यामुळे जे काही उघड झाले ते अनेक कुटुंबांसाठी सावध करणारे आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा