PF चे पैसे अडकलेत? आता अर्ज न करता थेट खात्यात येणार!

WhatsApp Group

EPFO PF Auto Transfer : नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा नोकरी बदलताना जुना PF (Provident Fund) ट्रान्सफर करायचा राहून जातो आणि वर्षानुवर्षे तो पैसा तसाच खात्यात अडकून पडतो. पण आता Employee Provident Fund Organisation (EPFO) ने या समस्येवर मोठा उपाय काढला आहे.

काय आहे EPFO चा नवीन ऑटो-ट्रान्सफर प्लॅन?

EPFO आता एक नवीन पायलट प्रोजेक्ट सुरू करत आहे, ज्यामुळे जुने, इनअॅक्टिव्ह (Inactive) किंवा डॉर्मंट PF खाते ओळखून त्यातील पैसे स्वतःहून (Automatic) तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहेत.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 8.1 लाख खाते ओळखण्यात आली असून त्यात तब्बल ₹5,200 कोटींचा निधी अडकलेला आहे.

याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता PF काढण्यासाठी

  • फॉर्म भरण्याची गरज नाही
  • ऑफिसचे फेरे मारावे लागणार नाहीत
  • लांबलचक प्रक्रिया टाळली जाईल

हेही वाचा – इस्त्रीवाल्याच्या खात्यात 598 कोटींचा व्यवहार, आयकर विभागाची नोटीस!

PF ‘लावारिस’ का होतो?

आजच्या काळात नोकरी बदलणं खूप सामान्य झालं आहे. चांगली सॅलरी आणि करिअर ग्रोथसाठी लोक वारंवार कंपनी बदलतात. पण याच घाईत:

  • जुना PF ट्रान्सफर करायचा राहतो
  • एकाच व्यक्तीचे अनेक PF खाते तयार होतात
  • जुन्या कंपनीची माहिती विसरली जाते

यामुळे खाते inactive होतं आणि त्यातले पैसे वर्षानुवर्षे अडकून राहतात.

अर्ज न करता पैसा खात्यात कसा येणार?

EPFO ची नवीन प्रणाली अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे.
ज्या क्षणी तुमचं जुने PF खाते ओळखलं जाईल, त्या क्षणी:

पैसे थेट तुमच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात जमा होतील

मात्र यासाठी काही अटी आवश्यक आहेत:

✔ PF खाते आधारशी लिंक असणे आवश्यक
✔ KYC माहिती पूर्ण आणि अचूक असावी
✔ बँक खाते व्हेरिफाइड असणे गरजेचे

पूर्वी ही सुविधा फक्त ₹1000 पर्यंतच्या रकमेसाठी होती, पण आता मोठ्या रकमेसाठीही लागू होणार आहे.

या छोट्या चुका तुमचा PF अडकवू शकतात

अनेकदा छोटी-छोटी चुका मोठा अडथळा ठरतात:

आधार आणि EPFO रेकॉर्डमध्ये नाव/जन्मतारीख mismatch
एकापेक्षा जास्त UAN नंबर असणे
बँक तपशील अपडेट नसणे
कंपनीने Exit Date अपडेट न करणे

त्यामुळे ऑटो-ट्रान्सफर सुरू होण्याआधी तुमची सर्व माहिती तपासून अपडेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

याचा तुम्हाला काय फायदा?

प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी होणार

अडकलेला PF सहज मिळणार

वेळ आणि मेहनत वाचणार

आर्थिक सुरक्षितता वाढणार

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment