

EPFO Withdrawal Rules 2025 : केंद्र सरकारच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) मार्फत लाखो कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात दर महिन्याला रक्कम जमा होते. ही रक्कम निवृत्तीनंतरचा आधार मानली जाते. मात्र, काही विशिष्ट कारणांसाठी आणि अटींवर नोकरी करत असतानाही पीएफमधून अंशतः रक्कम काढता येते.
कशासाठी काढता येतो पीएफचा पैसा?
EPFO च्या नियमानुसार, खालील कारणांसाठी अंशतः रक्कम काढता येते:
- वैद्यकीय गरजेसाठी – गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत पीएफ खात्यातून 6 महिन्यांचा पगार किंवा संपूर्ण योगदान यापैकी जो कमी असेल तो पर्याय निवडता येतो.
- घर खरेदी किंवा बांधकामासाठी – नोंदणीकृत संस्थेकडून घर घेण्यासाठी पीएफचा 90% पर्यंत रक्कम काढता येतो.
- शिक्षण किंवा लग्नासाठी – कर्मचारी किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी / लग्नासाठी पीएफचा 50% भाग काढता येतो.
- घर दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी – विशिष्ट कालावधीची सेवा पूर्ण केल्यानंतर पीएफचा ठराविक टक्का वापरता येतो.
अर्ज कसा करावा?
- अर्जासाठी EPFO च्या UAN पोर्टल वर लॉगिन करावे लागते.
- Form 31 भरून ऑनलाइन सबमिट करता येतो.
- आधार, बँक तपशील आणि नियोक्त्याची पुष्टी आवश्यक (काही कारणांसाठी नियोक्त्याची संमती गरजेची नसते).
महत्त्वाच्या सूचना
- नोकरीला लागून ५ वर्ष पूर्ण केले नसल्यास काही अटी लागू होतात.
- वारंवार पैसे काढल्यास निवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम कमी होऊ शकते.
- अर्ज करताना UAN आधारशी लिंक केलेले असणे गरजेचे आहे.
पीएफ म्हणजे फक्त निवृत्तीचा पर्याय नाही, तर आर्थिक संकटात असताना तो एक महत्त्वाचा आधार ठरू शकतो. मात्र, याचा विचारपूर्वक आणि गरजेनुसार वापर करणं अत्यंत आवश्यक आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!