

Friendship Day 2023 : झोमॅटो (Zomato) चे सीईओ दीपींदर गोयल यांनी फ्रेंडशिप डे मोठ्या थाटात साजरा केला. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरील त्यांच्या फॉलोअर्सना आश्चर्यचकित करण्यासाठी, गोयल यांनी एक पोस्ट टाकली. यामध्ये ते झोमॅटो डिलिव्हरी एजंटप्रमाणे रॉयल एनफिल्ड बाईक चालवत आहेत आणि बाईकच्या मागे झोमॅटो डिलिव्हरी बॅगही ठेवली आहे
झोमॅटोचे सीईओ डिलिव्हरी पार्टनर, रेस्टॉरंट पार्टनर आणि ग्राहकांना फ्रेंडशिप बँड आणि जेवण देणार होते. त्यांना फ्रेंडशिप डेच्या दिवशी ग्राहकांना सरप्राईज करायचे होते. फोटोंमध्ये त्यांनी अनेक फ्रेंडशिप बँड हातात घेतले. त्याच्या या कृतीने ट्विटरवरील लोक खूपच प्रभावित झाले. गोयल यांच्या पोस्टवर लोकांनी खूप कमेंट केल्या.
हेही वाचा – Asia Cup 2023 : ना सकाळी, ना रात्री….’या’ वेळेला खेळवले जाणार आशिया कपचे सामने!
आज देशभरात फ्रेंडशिप डे
भारतात फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. त्यामुळेच यंदा तो 6 ऑगस्ट, रविवारी साजरा होत आहे. भारताव्यतिरिक्त काही इतर देश देखील या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करतात, ज्यात बांगलादेश, यूएई, मलेशिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
झोमॅटो कंपनीने गुरुवारी आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले, जे धक्कादायक आहेत. कारण झोमॅटोने प्रथमच नफा नोंदवला आहे. कंपनीचा निव्वळ नफा 2 कोटी रुपये आहे, तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 186 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, झोमॅटोचा महसूल जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत वार्षिक आधारावर सुमारे 71 टक्क्यांनी वाढला आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!