

High Security Number Plate : नोएडा, गाझियाबाद आणि लखनऊसह उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरांमध्ये वाहने चालवताना सावधगिरी बाळगा. तुमच्या कार किंवा बाईकवर अद्याप हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावलेली नसेल, तर मोठे चलन भरण्यास तयार रहा. तुम्हाला १०००० रुपयांपर्यंतचे चलन भरावे लागू शकते, तसेच परिस्थिती उद्भवल्यावर तुमचे वाहनही जप्त केले जाऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही कारवाई आजपासून म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे.
आता सर्व वाहनांमध्ये ही नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. या नंबर प्लेटमध्ये तुमच्या नोंदणी क्रमांकाव्यतिरिक्त ७ अंकी यूनिक लेसर कोड आहे. ते सहज काढता येत नाही किंवा मिटवता येत नाही. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स लावण्याची मुदत १५ फेब्रुवारीला संपली आहे. अशा परिस्थितीत नोएडा, लखनऊ आणि गाझियाबाद वाहतूक पोलीस १६ फेब्रुवारीपासून अशा वाहनांविरोधात मोहीम सुरू करणार आहेत, ज्यांच्यावर ही नंबर प्लेट नसेल. गुरुवारपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांना पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
हेही वाचा – मुंबई-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस : ट्रेनचा टायमिंग काय? तिकीट किती? जाणून घ्या!
नोएडाचे डीसीपी (वाहतूक) म्हणाले की वाहतूक विभाग सूचनांचे पालन करेल आणि १६ फेब्रुवारीपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर ५००० रुपये दंड आकारला जाईल. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ-प्रशासन) सियाराम वर्मा यांनी सांगितले की, गौतम बुद्ध नगरमध्ये सुमारे ७ लाख गाड्या नोंदणीकृत आहेत. ते म्हणाले की, नोंदणी केलेल्या सुमारे ८० टक्के गाड्यांमध्ये एचएसआरपी बसवण्यात आली आहे.
लखनऊमध्ये १५ लाख वाहने
लखनऊमध्येही आजपासून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न लावल्यास चलन कापले जाणार आहे. लखनऊच्या १५,८२,००० वाहनांमध्ये आत्तापर्यंत HSRP लावता आले नाही. पहिल्या वेळी ५००० रुपये, दुसऱ्यांदा १०००० दंड. तर तिसऱ्यांदा वाहन जप्त करण्यात येणार आहे. जर तुम्ही नवीन नंबर प्लेटसाठी अर्ज केला असेल, तर बुकिंग पावती दाखवल्यावर कोणतेही चलन होणार नाही.