

Income Tax Return Deadline 2025 : नागरिक आणि व्यवसायिकांना दिलासा देणारी मोठी घोषणा आयकर विभागाकडून करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी (असेसमेंट इयर 2025-26) इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख पुन्हा एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. आधी ही डेडलाइन 31 जुलै 2025 होती, जी वाढवून 15 सप्टेंबर 2025 करण्यात आली होती. मात्र, आता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने ती 16 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.
वेबसाइट स्लो, फॉर्म डाउनलोडची अडचण – सरकारनं घेतला निर्णय
अनेक करदात्यांनी आयकर पोर्टलच्या स्लो स्पीडची तक्रार केली होती. काहींनी फॉर्म डाऊनलोड करताना अडचणी येत असल्याचं निदर्शनास आणलं. या तांत्रिक त्रुटी लक्षात घेता CBDT कडून एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही 16 सप्टेंबर 2025 पर्यंत ITR भरू शकता.
हेही वाचा – चहा प्यायच्या आधी पाणी पिणं – खरंच होते का ऍसिडिटीपासून सुटका? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
31 डिसेंबरपर्यंत अजून एक संधी!
जर तुम्ही 16 सप्टेंबरपर्यंतही तुमचा ITR भरू शकला नाही, तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्याकडे अजूनही 31 डिसेंबर 2025 पर्यंतची संधी उपलब्ध आहे. मात्र ही रिटर्न लेट फाइलिंगच्या श्रेणीत जाईल आणि त्यासाठी दंड आकारण्यात येतो.
उशिरा ITR फाईल केल्यास काय होईल?
लेट फाइलिंग म्हणजे बिलेटेड रिटर्न – जो मूळ निर्धारित तारखेपर्यंत भरलेला नाही. आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, असे करदाते असेसमेंट इयर समाप्त होण्याच्या 3 महिने आधीपर्यंत किंवा असेसमेंट पूर्ण होण्यापूर्वी (जे आधी होईल) रिटर्न दाखल करू शकतात.
किती दंड भरावा लागेल?
जर तुम्ही ITR निश्चित तारखेनंतर भरला, तर सेक्शन 234F नुसार तुम्हाला दंड भरावा लागतो.
- बहुतेक नागरिकांसाठी हा दंड ₹5,000 असतो.
- मात्र, जर तुमचं एकूण उत्पन्न ₹5 लाखांपर्यंत असेल, तर दंड केवळ ₹1,000 इतकाच असतो.
- धारा 139(1) च्या अंतर्गत जर मूळ तारीख चुकवली असेल, तर हा लेट फी लागू होतो.
वेळेवर रिटर्न भरल्याचे फायदे काय?
- रिफंड वेळेवर मिळतो
- टॅक्स नोटिस टळतात
- कर्ज घेताना फायनान्शियल डॉक्युमेंट म्हणून उपयोग होतो
- भविष्याची टॅक्स प्लानिंग सुलभ होते
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा