

Mercedes Vision One-Eleven : जर्मन कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने भविष्यातील कार कशी असेल याचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर आणले आहे. मर्सिडीजची ही कॉन्सेप्ट कार सोशल मीडियावर व्हायरल झाली. मर्सिडीज-बेंझने भविष्यातील कारसाठी व्हिजन वन इलेव्हन कॉन्सेप्ट उघड केली आहे. ही कॉन्सेप्ट अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील इंटरनॅशनल डिझाइन सेंटरमध्ये विकसित करण्यात आली आहे. ही कार मर्सिडीजने 1970 च्या दशकात सादर केलेल्या C111 वर बनवली आहे.
डिझाइन
कंपनीने दाखवलेल्या या कारला अतिशय आलिशान लुक देण्यात आला आहे. त्याची उंची केवळ 1168 मिमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे ग्राउंड क्लिअरन्स फार कमी आहे. कारच्या केबिनलाही फ्युचरिस्टिक डिझाइन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, ज्यामध्ये खूप मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. या कारमधील स्टीअरिंग डिझाइनही खूप वेगळे ठेवण्यात आले असून, लाउंजसारखा लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारमध्ये फक्त दोन लोक बसू शकतात. कारला दोन दरवाजे आहेत आणि दोन्ही दरवाजे वरच्या दिशेने उघडतात.
Mercedes Benz debuts the Vision One-Eleven concept car pic.twitter.com/39w7m5ia8f
— highsnobiety (@highsnobiety) June 15, 2023
हेही वाचा – Video : महिलेने भर रस्त्यात उडवल्या 500-500 च्या नोटा! गर्दी जमली आणि…
Ready to take off into a new era of sportive luxury, the extraordinary Vision One-Eleven showcases a highly dynamic design language and all-electric drive technology, powered by axial flux motors from YASA. Learn more: https://t.co/JLvraAhRY3#mercedesbenz #VisionOneEleven #C111 pic.twitter.com/k5gP0ROgpZ
— Mercedes-Benz (@MercedesBenz) June 15, 2023
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मर्सिडीज या भविष्यातील कारचे डिझाइन आणि फीचर्स AMG इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये वापरू शकते. मात्र, या कॉन्सेप्ट कारमध्ये कंपनीने पाच-सिलेंडर V8 टर्बोचार्ज केलेले इंजिन वापरले आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!