Success Story : एकेकाळी मुलांसाठी फुगे बनवायची MRF कंपनी, आता बनलीय टायर ब्रँड!

WhatsApp Group

Success Story : MRF कंपनीबद्दल सर्वांना माहिती असेलच. एकेकाळी ही कंपनी एका छोट्या शेडमध्ये फुगे (Balloon) बनवून सुरू करण्यात आली होती. ही फुगे निर्मिती करणारी कंपनी पुढे एक शक्तिशाली टायर बनवणारा ब्रँड बनेल याची तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती. आजकाल या कंपनीच्या शेअर्सची बाजारात मोठी उलाढाल होत आहे. कंपनीच्या शेअरनेही एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा देशातील पहिला स्टॉक आहे, ज्याने एक लाख रुपयांचा (प्रति शेअर 1 लाख) आकडा गाठला आहे.

1940 मध्ये कंपनीची सुरुवात

MRF कंपनी 1940 मध्ये सुरू झाली. त्यावेळी कंपनीने केवळ 14 हजार रुपयांच्या निधीतून रबर बलून कारखाना सुरू केला. पुढे 1949 मध्ये कंपनीने लेटेक्स कास्ट खेळणी, हातमोजे आणि गर्भनिरोधक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.

1952 मध्ये कंपनीने रबर उत्पादन सुरू केले. हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केल्याच्या अवघ्या 4 वर्षात, MRF स्टॉक 50% च्या मार्केट शेअरसह भारतातील रबर मार्केटचा लीडर बनला होता. नंतर 1961 मध्ये, कंपनी MRF देशाची सार्वजनिक कंपनी बनली.

1964 मध्ये अनेक शहरांमध्ये प्लांट सुरू 

यानंतर, 1964 मध्ये, कंपनीने देशातील अनेक शहरांमध्ये प्लांट उघडण्यास सुरुवात केली, त्यानंतर कंपनीने कोट्टायम, अरकोनम आणि गोव्यासह अनेक शहरांमध्ये नवीन प्लांट्स उभारले.

हेही वाचा – Bank Locker : बँकेत आपल्याला लॉकर कसं मिळतं? त्याची प्रोसेस काय? जाणून घ्या!

क्रीडा क्षेत्रातही मोठे नाव

1988 मध्ये, कंपनीने स्पोर्ट्स सेग्मेंटमध्ये प्रवेश केला, त्यानंतर अनेक मोठ्या क्रिकेटपटूंनीही याला प्रोत्साहन दिले. 1989 मध्ये, MRF ने हॅस्ब्रो इंटरनॅशनल यूएसए, जगातील सर्वात मोठी खेळणी उत्पादक कंपनीशी करार केला आणि Funskool India लाँच केले.

कंपनीची उलाढाल

याशिवाय, 2011 मध्ये, कंपनीने अंकनपल्ली (आंध्र प्रदेश) येथे सातवा प्लांट आणि 2011 मध्ये त्रिची (तामिळनाडू) येथे आठवा प्लांट सुरू केला. कंपनीच्या उलाढालीबद्दल बोलायचे तर ते आता सुमारे $2 बिलियन झाले आहे. 2015 मध्ये, MRF चे नाव फोर्ब्सच्या टॉप 50 सर्वोत्कृष्ट भारतीय कंपन्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment