मुंबईतील भीषण BEST बस दुर्घटना : काही क्षणांत चारचा बळी, नऊ जखमी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

WhatsApp Group

Mumbai BEST Bus Accident : भांडुप रेल्वे स्टेशनच्या बाहेर सोमवारी (29 डिसेंबर) रात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली आहे. रात्री सुमारे 9:30 वाजता एक BEST बस अचानक अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना चिरडत गेली. या दुर्दैवी अपघातात 3 महिलांसह 4 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रात्रीचा वेळ असल्याने भांडुप स्टेशन परिसर नेहमीप्रमाणे गर्दीने फुललेला होता. कोणी खरेदी करत होते, तर काहीजण स्टेशनवरून घराकडे परतत होते. अशातच अचानक धावणारी बस अनियंत्रित झाली आणि क्षणार्धात सगळं काही बदलून गेलं. अचानक उठलेल्या आक्रोशाने परिसर दणाणला.

प्रत्यक्षदर्शी सांगतात, “सगळं इतकं पटकन घडलं की कोणी काही समजूनही घेतलं नाही… काही क्षणांत अनेक जण रस्त्यावर कोसळले.” अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र तुटलेल्या चप्पला, फुटलेली बॅगा आणि रक्ताचे डाग दिसत होते. लोकांची आरडाओरड, अपल्यांना शोधण्याची धावपळ… हा सगळा देखावा हेलावून टाकणारा होता. त्या काही सेकंदांनी अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले.

हेही वाचा – एका दिवसात चांदी तब्बल ₹21,000 ने घसरली! पण अचानक असे काय घडले?

बसमध्ये त्या वेळी प्रवासी नसल्याचेही समोर आले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु चार जणांना वाचवता आले नाही. अपघातानंतर संतापलेल्या नागरिकांनी बस चालकाला पकडून मारहाण केली. मात्र पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.

डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, “चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. ब्रेक फेल झाले होते का अथवा निष्काळजीपणा याची तपासणी केली जात आहे.” पोलिसांनी स्टेशन रोड काही काळासाठी बंद ठेवला. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करून तपास सुरू करण्यात आला आहे. बसला क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात आले. मुंबईत वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातांवरून सुरक्षेबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment