

Rajasthan School Roof Collapse : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील मनोहरथाना तालुक्यातील पिपलौदी प्राथमिक शाळेच्या इमारतीची छत शुक्रवार (२५ जुलै) रोजी कोसळली. या भीषण अपघातात ४ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० मुलांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे, त्यातील ३ ते ४ मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.
बचावकार्य सुरु
घटना घडली तेव्हा शाळेत वर्ग सुरु होते. अचानक छत कोसळल्याने विद्यार्थी थेट ढिगाऱ्याखाली गाडले गेले. शिक्षक, गावकरी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले असून जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्यात येत आहे. अजूनही काही मृतदेह आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
VIDEO | Jhalawar, Rajasthan: Roof of Piplodi Primary School collapses, several children feared trapped. Rescue operations underway.#RajasthanNews #Jhalawar
— Press Trust of India (@PTI_News) July 25, 2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/K0STKQwP0A
प्रशासनाची तत्काळ प्रतिक्रिया
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधीक्षक अमित कुमार यांनी सांगितले की, “ही दुर्घटना अत्यंत हृदयविदारक आहे. प्रशासन बचावकार्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात येत आहे.”
हेही वाचा – नरेंद्र मोदींचा विक्रम! इंदिरा गांधींना मागे टाकून देशाचे दुसऱ्यांदा सर्वाधिक काळ पंतप्रधान
शासन आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया
राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी शोक व्यक्त करत सांगितले, “घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेण्यात आली असून बचावकार्य गतीने सुरु आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत दिली जाईल.”
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “मनोहरथाना परिसरात शाळेची इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना अत्यंत वेदनादायक आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, जास्तीत जास्त प्राण वाचवले जावोत आणि जखमींना लवकर बरे वाटो.”
जनतेचा शोक
संपूर्ण झालावाड जिल्ह्यात या घटनेमुळे शोक आणि संतापाचं वातावरण आहे. पालक आणि ग्रामस्थांनी शाळेच्या इमारतीच्या देखभालीबाबत प्रशासनाकडून उत्तरदायित्व मागितले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!