

SBI Recruitment 2023 : सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात अनेकजण आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी सर्वांपासून चुकते. त्यामुळेच ‘वाचा मराठी’नं पुढाकार घेत, नोकरीची संधी आणि त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यामुळं नोकरीची गरज असलेला तरुणवर्ग खालील ठिकाणी अर्ज करु शकतील.
तुम्ही बँक नोकऱ्या शोधत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये अर्ज करण्याची ही सुवर्णसंधी आहे. SBI ने 6,000 पेक्षा जास्त अपरेंटिस भरती 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार nsdcindia.org/apprenticeship किंवा apprenticeshipindia.org किंवा bfsissc.com किंवा Bank.sbi/careers किंवा www.sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
SBI अप्रेंटिस भर्ती 2023 च्या अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. उमेदवार 21 सप्टेंबर किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 1 वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी असेल. या भरती मोहिमेद्वारे देशभरातील बँकांमध्ये एकूण 6160 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
हेही वाचा – झिम्बाब्वेच्या दिग्गज क्रिकेटरचे निधन, पत्नीची इमोशनल पोस्ट
महत्त्वाच्या तारखा
- SBI अपरेंटिस अधिसूचना तारीख : 31 ऑगस्ट 2023
- SBI अपरेंटिस अर्ज सुरू : 1 सप्टेंबर 2023
- SBI अपरेंटिस अर्जाची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2023
- SBI अपरेंटिस परीक्षेची तारीख : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023 मध्ये
SBI Apprentice Recruitment 2023 Notification
कोण अर्ज करू शकतो?
SBI अपरेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तर अर्जदारांची किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2023 पर्यंत 28 वर्षे आहे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती नियमांनुसार वयात कमाल सूट दिली जाईल. अधिक माहितीसाठी, अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
आता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया
SBI अपरेंटिस भरती 2023 साठी निवड प्रक्रिया मागील भरती मोहिमेसारखीच आहे. ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षा उत्तीर्ण करून उमेदवार ही नोकरी मिळवू शकतात. ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी हजर राहावे लागेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!