BIG NEWS..! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा

WhatsApp Group

Sheikh Hasina Death Sentence : ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) सोमवारी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे बांगलादेशाच्या राजकारणात तीव्र खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ‘मानवतेविरुद्ध गुन्ह्यां’बद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून, जुलै–ऑगस्ट 2024 मधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा सर्वात मोठा जबाबदार ठरवत न्यायालयाने त्यांना दोषी धरले आहे.

काय होते या खटल्याचे आरोप?

ICT न्यायाधीशांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै–ऑगस्ट 2024 मधील आंदोलनात सुमारे 1,400 लोकांचा मृत्यू झाला, तर जवळपास 24,000 जण जखमी झाले होते. न्यायालयाने म्हटले की, त्या काळात शेख हसीना यांच्या सरकारने आंदोलन दडपण्यासाठी प्राणघातक शस्त्रांचा वापर, हेलिकॉप्टरमधून गोळीबार आणि कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार, एका कथित संभाषणात हसीनांनी दक्षिण ढाका नगर पालिकेच्या माजी महापौरांशी बोलताना हेलिकॉप्टर आणि शस्त्रांच्या वापराचे आदेश दिल्याचे नमूद आहे.

ICT न्यायाधीशांनी सांगितले की शेख हसीनांनी आंदोलनकर्त्यांना ‘राज्याचे शत्रू’ असा उल्लेख केला आणि ‘राझाकार’ अशी उपहासात्मक टिप्पणी करून हिंसा उकसवली. 14 जुलैच्या पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांचा देखील विचारात घेतला गेला.

फक्त हसीना नव्हे, इतरही नेते दोषी

  • माजी गृहमंत्री असदुझ्झामान खान कमाल यांनाही फाशीची शिक्षा
  • माजी पोलीसप्रमुख चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना 5 वर्षांची शिक्षा

कमाल आणि हसीना हे दोघेही खटल्यादरम्यान अनुपस्थित होते आणि त्यांना न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

हेही वाचा – सौदी अरेबियात भीषण बस अपघात; 42 भारतीय उमराह यात्रेकरूंचा मृत्यू! जाणून घ्या काय आहे हे उमराह

मुख्य अभियोजकांचे मोठे आरोप

मुख्य सरकारी वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी शेख हसीनांना “विद्यार्थी आंदोलनातील अत्याचारांची मुख्य सूत्रधार” असे संबोधले. तथापि, हसीनांच्या समर्थकांनी हे आरोप राजकीय सूडातून झाल्याचे म्हटले आहे.

भारतामध्ये आश्रय, ढाक्याचा भारताकडे प्रत्यार्पण मागणी

5 ऑगस्ट 2024 रोजी सरकार कोसळल्यानंतर शेख हसीना बांगलादेशातून पळून भारतात दाखल झाल्या. असदुझ्झामान कमाल देखील भारतात असल्याचे मानले जाते. दरम्यान, अंतरिम सरकारप्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, मात्र भारताकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

ढाक्यात सुरक्षा तणाव

निकाल घोषित होण्याच्या एक दिवस आधी ढाका महानगर पोलिसांनी संपूर्ण शहरात उच्चस्तरीय सुरक्षा तैनात केली. पोलीस आयुक्त शेख सज्जात अली यांनी आगजनी, स्फोट किंवा हिंसाचार करणाऱ्यांना ‘शूट-ऍट-साइट’ आदेश दिले आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment