UPSC अपयशानंतरही करिअरला नवे वळण, कंपन्या देत आहेत थेट जॉब ऑफर!

WhatsApp Group

UPSC Public Disclosure Scheme : IAS-IPS बनण्याचे स्वप्न पाहणारे हजारो उमेदवार UPSC परीक्षेत अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही नोकरीपासून दूर राहतात. मात्र आता त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. UPSC ने ‘पब्लिक डिस्क्लोजर स्कीम (PDS)’ सुरु केली आहे, ज्यामुळे अशा “नॉन-सेलेक्टेड” पण पात्र उमेदवारांना खासगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळू लागल्या आहेत.

काय आहे UPSC ची PDS योजना?

UPSC दरवर्षी सुमारे 6,400 उमेदवारांची निवड करते, मात्र अंतिम यादीतून वगळले गेलेले 26,000 हून अधिक पात्र उमेदवार आता या नव्या योजनेमुळे चर्चेत आले आहेत. ‘PDS स्कीम’ (Public Disclosure Scheme) अंतर्गत, UPSC या नॉन-सेलेक्टेड उमेदवारांची माहिती (शैक्षणिक पात्रता, बायोडेटा, कॉन्टॅक्ट नंबर) खासगी कंपन्यांशी शेअर करते — अर्थात उमेदवारांच्या संमतीनंतरच.

अरुण के. यांचा बदललेला करिअर प्रवास

32 वर्षीय अरुण के. हे UPSC परीक्षेत अंतिम मुलाखतीपर्यंत पोहोचले. मात्र यश मिळालं नाही. त्यांनी एका स्थानिक शाळेत ऍडमिन असिस्टंट म्हणून काम सुरु केलं. काही महिन्यांतच त्यांना दिल्लीतील एका कॉर्पोरेट कंपनीतून थेट कॉल आला. UPSC परीक्षेतील त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्या कंपनीने त्यांना चांगल्या पगारावर मिड-सिनीयर पोस्टवर नोकरी दिली.

हेही वाचा – MHADA Lottery 2025 : नवी मुंबईत 14 लाखांत घर! सानपाडा, नेरुळसह 293 घरांसाठी सुवर्णसंधी

खासगी कंपन्यांना कसा होतो फायदा?

UPSC ने 2025 पासून एक विशेष पोर्टल सुरू केलं आहे, जिथे कॉर्पोरेट कंपन्या आपला अधिकृत ID वापरून रजिस्टर होऊ शकतात आणि उमेदवारांची माहिती पाहू शकतात. या पोर्टलवर:

  • नॉन-सेलेक्टेड पण पात्र उमेदवारांची माहिती
  • थोडकं बायोडेटा आणि शैक्षणिक पात्रता
  • थेट संपर्क नंबर
  • कंपनीच्या गरजेनुसार फिल्टर, सर्च, शॉर्टलिस्ट सुविधा

UPSC ठेवतोय संपूर्ण प्रोसेसवर नजर

निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी UPSC स्वतः संपूर्ण प्रोसेसवर नजर ठेवतो. उमेदवारांना जॉइनिंग लेटर मिळेपर्यंत UPSC कंपन्यांशी समन्वय साधतो. कंपन्यांना पोर्टलवर लॉगिन, रिपोर्टिंग आणि अपडेट्सची सुविधा दिली गेली आहे.

शेवट नव्हे, सुरुवात ठरतेय UPSC

PDS योजनेची सुरुवात 2018 मध्ये केवळ सरकारी क्षेत्रासाठी झाली होती, मात्र 2025 पासून खासगी क्षेत्रालाही प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे UPSC परीक्षेत ‘अपयशी’ ठरलेले अनेक उमेदवार आता यशस्वी कॉर्पोरेट करिअरकडे वाटचाल करत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment