Gold Silver Price Today : सोने खरेदी करण्याची चांगली संधी! वाचा आजचा रेट

WhatsApp Group

Gold Silver Price Today : तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही खूप उपयुक्त बातमी आहे. उद्योग मानकांनुसार, आज देशात सोन्याचा भाव 24 कॅरेटसाठी 59,580 रुपये आणि 22 कॅरेटसाठी 54,580 रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने तेजी सुरू होती. आज सोन्याचा भाव खाली आला आहे. अशा परिस्थितीत या वीकेंडला सोने खरेदीची चांगली संधी आहे.

मुंबईत सोन्याचे दर

  • 22 कॅरेट 55,100
  • 24 कॅरेट 60,110

हेही वाचा – EPFO : घरबसल्या ऑनलाइन PF कसा काढतात? जाणून घ्या ‘या’ स्टेप्स

शनिवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांची घट झाली. त्याचबरोबर चांदी 200 रुपये किलोने महागली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या सोन्या-चांदीचे सरासरी भाव पुढीलप्रमाणे होते –

  • सोने 60,800 रुपये प्रति 10 ग्रॅम.
  • चांदी 72,700 रुपये प्रति किलो.
  • चांदीचे नाणे रु. 825 प्रति नग.

भारतातील सोन्या-चांदीची किंमत बाजाराच्या व्यापारानुसार निर्धारित केली जाते, व्यापाराच्या दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजार दर मानला जातो. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्ज लावून त्याची विक्री करतो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment