

Petrol Diesel Price Today : भारतातील तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. ही किंमत अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. सोमवार, ११ सप्टेंबर २०२३ रोजी देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट दिसून येत आहे. काही शहरांमध्ये इंधनाचे दरही वाढले आहेत (Fuel Rates Today).
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Today)
चार महानगरांबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत, तर चेन्नईमध्ये दर वाढले आहेत. नवी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 11 पैशांनी महागले असून ते 103.74 रुपये आणि डिझेल 9 पैशांनी महागले असून ते 94.33 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
कच्च्या तेलाची स्थिती काय आहे?(Fuel Rates Today)
जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोललो तर त्यात घट झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 0.53 टक्क्यांनी कमी झाली आहे आणि ती प्रति बॅरल $ 90.17 वर व्यवहार करत आहे. WTI क्रूड ऑइलच्या किमतीत 0.85 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे आणि ती प्रति बॅरल $ 86.77 वर आहे.
हेही वाचा – VIDEO : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीकडून जसप्रीत बुमराहला स्पेशल गिफ्ट!
कोणत्या शहरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले? (Petrol Diesel Price Today)
नोएडा – पेट्रोल 16 पैसे स्वस्त 96.76 रुपये, डिझेल 15 पैसे स्वस्त 89.93 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.
गुरुग्राम- पेट्रोल 13 पैसे स्वस्त 108.40 रुपये, डिझेल 12 पैसे स्वस्त 89.84 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.
पुणे- पेट्रोल ३४ पैसे स्वस्त होऊन १०६.२० रुपये, डिझेल ३३ पैसे स्वस्त होऊन ९२.७१ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे तपासायचे?
ग्राहकांच्या सोयीसाठी सरकारी तेल कंपन्या दररोज केवळ मेसेजद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासण्याची सुविधा देतात. किंमत जाणून घेण्यासाठी, BPCL ग्राहकांनी 9223112222 वर <डीलर कोड> पाठवावा. HPCL ग्राहकांनी 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> पाठवावा. किंमत जाणून घेण्यासाठी, इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा. काही मिनिटांनंतर तुम्हाला नवीनतम दराची माहिती मिळेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!