

Petrol-Diesel Price Today : आज ७ नोव्हेंबरला पेट्रोल डिझेलच्या दरावर मेट्रो शहरांमध्ये कोणताही दिलासा दिसून येत नाहीये, परंतु देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल दिसून आला आहे. दररोज सकाळी ६ वाजता, देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्या जसे की इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. आज ७ नोव्हेंबर २०२२ रोजी देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती जुन्याच दरांवर कायम आहेत आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ :
कच्च्या तेलाच्या किमती आज तेजीत आहेत. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल डॉलर ९७.७८ वर व्यापार करत आहे आणि डब्ल्यूटीआई क्रूड प्रति बॅरल डॉलर ९१.६२ वर आहे.
देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत-
दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
हेही वाचा- भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का? CM एकनाथ शिंदे म्हणाले…
या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल
पंजाबमध्ये पेट्रोलचा दर २५ पैशांनी वाढून ९६.८९ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेलचा दरही २५ पैशांनी वाढून ८७.२४ रुपये प्रतिलिटर झाला आहे.
महाराष्ट्रात पेट्रोलचा दर ३२ पैशांनी कमी होऊन १०६.८५ रुपये प्रतिलिटर झाला आहे. येथे डिझेलची किंमत ३३ पैशांनी घसरून ९३.३३ रुपये प्रति लिटरवर आली आहे.
राजस्थानमध्ये पेट्रोल ८१ पैशांनी वाढून १०८.८८ रुपये आणि डिझेल ७३ पैशांनी वाढून ९४.०८ रुपये झाले आहे.
अशा प्रकारे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासा-
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत तपासण्यासाठी तुम्ही SMS वापरू शकता. तुम्हाला बीपीसीएल ग्राहकाला पेट्रोल-डिझेलची किंमत तपासायची असल्यास, RSP<डीलर कोड> लिहा आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!