हात धुवूनही आजारी पडताय? मग हा रिपोर्ट तुमच्यासाठीच आहे!

WhatsApp Group

Public Toilet Hand Dryer : आजकाल शॉपिंग मॉल, सिनेमा थिएटर, रेस्टॉरंट्स किंवा ऑफिसमध्ये असलेल्या सार्वजनिक टॉयलेटमध्ये हँड ड्रायर असणं फार सामान्य झालं आहे. हात धुतल्यानंतर त्यांना वाळवण्यासाठी हँड ड्रायरचा वापर केला जातो. पण, एक संशोधन असं सूचित करतं की हा हँड ड्रायर तुमच्या आरोग्यासाठी गंभीर धोका बनू शकतो.

हँड ड्रायरमधून हवेसोबत सूक्ष्मजंतूही बाहेर पडतात!

नेशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार, सार्वजनिक शौचालयांमधील हँड ड्रायर वापरल्यानं वातावरणातील बॅक्टेरिया आणि एरोसोलची पातळी 3.81 × 10² CFU/m³ पर्यंत वाढू शकते. म्हणजेच, हवा अधिक दूषित होते आणि आरोग्यास धोका निर्माण होतो.

हँड ड्रायर हवा कुठून खेचतो, यावर तुमचं आरोग्य ठरतं!

हँड ड्रायर वॉशरूममधीलच हवा खेचतो आणि तीच मोठ्या वेगाने हातांवर फेकतो. वॉशरूमची हवा आधीच जंतूंनी, धूळ-कणांनी आणि मलांशांनी भरलेली असते. त्यामुळे अशा हवेचा हातांवर थेट संपर्क होणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

हेही वाचा – ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय! औषधांपासून ट्रकपर्यंत सर्व वस्तूंवर जबरदस्त टॅरिफ – जग हादरलं!

हात धुतल्यानंतर 10 पट अधिक जंतू हातांवर!

एका रिसर्चनुसार, हँड ड्रायरने वाळवलेले हात, टिश्यू वापरून वाळवलेल्या हातांपेक्षा 10 पट अधिक जंतू असतात. यामुळे हँड ड्रायर ‘हात स्वच्छ’ करण्याऐवजी अधिक घाणेरडे करत असल्याचं सिद्ध झालं आहे.

कोणत्या प्रकारच्या आजारांचा धोका?

1. हातांवर इन्फेक्शन:

हँड ड्रायरमुळे हातांवर जंतूंचं प्रमाण वाढतं, जे त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करून संसर्ग पसरवतात.

2. अ‍ॅलर्जी आणि अस्थमा:

धूळ आणि बॅक्टेरियायुक्त एरोसोलमुळे हँड ड्रायर वापरणाऱ्यांना श्वसनाच्या त्रासाचा धोका अधिक वाढतो. अ‍ॅलर्जी किंवा अस्थमाच्या पेशंटसाठी हा धोका गंभीर ठरू शकतो.

3. पोटाचे आजार:

हँड ड्रायरच्या हवेमुळे E. coli, Salmonella सारखे जीवाणू हातांवर चिकटतात, जे नंतर अन्न खाण्याच्या वेळेस शरीरात जातात आणि पाचनाशी संबंधित आजार होऊ शकतात.

 4. मुलं आणि वृद्ध अधिक धोक्यात:

संशोधनात असं आढळून आलं आहे की वृद्ध आणि लहान मुलांची इम्युनिटी कमी असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर हँड ड्रायरमधील बॅक्टेरिया अधिक परिणाम करतात.

सुरक्षित राहण्यासाठी काय करावं?

  • शक्य असेल तेव्हा हँड ड्रायर टाळा.
  • टिश्यू पेपर वापरून हात पुसा.
  • टिश्यू नसेल तर हात हवेत हलवत नैसर्गिकरित्या वाळवा.
  • लहान मुलांना हँड ड्रायरपासून दूर ठेवा.
  • पब्लिक टॉयलेटमधून बाहेर पडल्यावर हात सॅनिटायझरने निर्जंतुक करा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment