CNG आणि PNG च्या किमती आजपासून वाढल्या..! ‘असे’ आहेत नवे दर

WhatsApp Group

CNG PNG Price Hike : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लि. (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो ६ रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय, पाइप्ड कुकिंग गॅस (PNG) च्या किमतीत प्रति युनिट ४ रुपये (SCM) वाढ करण्यात आली आहे. सोमवारी रात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ची किरकोळ किंमत ८६ रुपये प्रति किलो झाली आहे. त्याच वेळी, घरगुती पीएनजीची किंमत प्रति एससीएम ५२.५० रुपये असेल.

यामुळे वाढलीय किंमत

सरकारने १ ऑक्टोबरपासून गॅसच्या किमती ४० टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यामुळे हे पाऊल उचलावे लागल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने म्हटले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पेट्रोलियम किंमत आणि विश्लेषण कक्षाने ३० सप्टेंबर रोजी १ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतींमध्ये ४० टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी १ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय किमतीचा हवाला देत गॅसच्या किमतीत ११० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

हेही वाचा – १६ वर्षाच्या आदिवासी पोरीची कमाल..! NASA च्या प्रकल्पासाठी निवड; ‘हे’ संशोधन ठरलं लक्षवेधी!

वर्षातून दोनदा किंमत वाढते

सरकार वर्षातून दोनदा १ एप्रिल आणि ३० सप्टेंबर रोजी गॅसच्या किमतीत सुधारणा करते. एमजीएलने म्हटले आहे की, या दरवाढीनंतर सीएनजी आणि पेट्रोलमधील किमतीतील बचत ४५ टक्क्यांवर आली आहे. त्याच वेळी, पीएनजी आणि एलपीजीमधील हा फरक केवळ ११ टक्के राहिला आहे. देशातील इतर शहरांमध्येही नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्यानंतर लगेचच सीएनजी ८ ते १२ रुपयांनी महाग होऊ शकतो, तर स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत ६ रुपयांनी वाढ होऊ शकते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment