

Maharashtra cabinet expansion : महाराष्ट्रात आज एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात एकूण १८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. भाजपच्या ९ आमदारांनी आणि एकनाथ शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात चर्चा मात्र एका नावाची मोठ्या प्रमाणात होत आहे. मंगलप्रभात लोढा. मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची एकूण संपत्ती ऐकली तर तुम्ही थक्क व्हाल. ४४ हजार २७० कोटी इतक्या धनाचे लोढा मालक आहेत. लोढा डेव्हलपर्सचे मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्या कुटुंबाला देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून ओळखलं जातं.
मंगलप्रभात यांचे वडील कोण होते?
१ डिसेंबर १९५५ रोजी जोधपूरमध्ये जन्मलेल्या लोढा यांनी जोधपूर विद्यापीठातून शिक्षण घेतलं. मुंबईतील सर्वात ‘पॉश’ विधानसभा मतदारसंघ मलबार हिलमधून ते पाचव्यांदा आमदार झाले आहेत. त्याच वर्षी त्यांना मुंबई भाजपचे अध्यक्षही करण्यात आलं. त्यांचे वडील गुमानमल लोढा हे स्वातंत्र्यसैनिक होते, नंतर ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि नंतर पाली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. गेल्या वर्षीच जोधपूरमध्ये त्यांचा पुतळा बसवण्यात आला होता. लोढा यांची कंपनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीतही शेअरहोल्डर आहे.
विधानसभा सदस्य @MPLodha यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.#शपथविधीसोहळा pic.twitter.com/ZRoWOEAMSn
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 9, 2022
हेही वाचा – जाणून घ्या…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत १० महत्त्वाच्या गोष्टी!
मंगलप्रभात लोढा यांचा विवाह जालोर जिल्ह्यातील भीनमाळ येथील लुंकड कुटुंबातील मंजू लुंकड यांच्याशी झाला होता. मंजू यांचे वडील किशोरमल लुंकड हे भिनमाळमध्ये ७२ जिनालये बांधणारे आहेत. लग्नानंतर मंजूच्या आडनावात लोढा जोडले गेले. मंजू लोढा त्यांच्या पतीच्या कंपनीत समान भागधारक बनल्या.
आमदार असूनही मंत्रीपद नव्हतं!
२०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा यांनी निवडणूक लढवली आणि ७० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. ६६ वर्षीय लोढा मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत. लोढा हे मारवाडी समाजाचा मुख्य चेहरा मानले जातात. १९९५ पासून ते सलग सहा वेळा आमदार राहिले असले तरी त्यांना कधीही मंत्रीपद मिळाले नव्हते. मुंबई, ठाण्यासहीत अनेक उपनगरांमध्ये लोढा बिल्डर्स म्हणून ते लोकप्रिय आहेत.
हेही वाचा – ‘बिझनेस माइंडेड’ अभिनेते प्रदीप पटवर्धन आपल्याच नाटकाची तिकिटं ब्लॅकनं विकायचे?
तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाकडून शपथ घेतली. तर गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांनी भाजपाकडून शपथ घेतली आहे.