तिरुपतीहून आलेल्या सोलापूरच्या कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू, सासू-सून आयसीयूमध्ये!

WhatsApp Group

Solapur Gas Leak Tragedy : देवदर्शनावरून सुखानं परतलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. तिरुपतीहून दर्शन करून परतलेल्या सोलापूरमधील युवराज मोहनसिंह बलरामवाले यांच्या कुटुंबातील दोन लहान मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला असून सासू-सूनेची अवस्था गंभीर आहे. ही दुर्घटना रविवारच्या रात्री घडली असून, सकाळी उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्याने प्रकार उघडकीस आला.

परिवारानं तिरुपतीहून आणलेला प्रसाद नातेवाईकांत वाटल्यानंतर सगळे झोपी गेले. मात्र घरात एलपीजी गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे घरातील सर्वजण बेशुद्ध झाले. घर केवळ 10 बाय 5 फुटांचे होते आणि खिडकीही नव्हती. त्यामुळे गॅस बाहेर निघू शकला नाही. सकाळी 11 वाजता दरवाजा उघडला जात नसल्यामुळे नातेवाईकांनी दार तोडले, तेव्हा सगळ्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि गॅसचा प्रचंड वास येत होता.

दुर्दैवाने, सहा वर्षांचा हर्ष आणि चार वर्षांची अक्षरा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील युवराज (40), आई रंजना (35) आणि आजी विमल (60) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सासू-सूनेला ICU मध्ये हलवण्यात आले आहे.

हेही वाचा – Manoj Jarange Maratha Reservation Protest : मुंबईत आंदोलन सुरू, मिरजकरांची ‘मोठी’ मदत; दोन ट्रकमधून पाठवली अन्नसामग्री!

हे कुटुंब दोन दिवसांपूर्वीच तिरुपतीच्या दर्शनाहून परतले होता. युवराज कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो, रंजना विडी कामगार आहेत आणि विमल एका रुग्णालयात कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. रंजना यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेनं घरी येऊन दरवाजा न उघडल्याने ही दुर्घटना उघडकीस आणली. सध्या संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकारामुळे गॅससुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होऊ शकतो, याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment