

MHADA Lottery 2025 Navi Mumbai : नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने MHADA Lottery 2025 अंतर्गत नवी मुंबईतील 293 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. ही घरं सानपाडा, नेरुळ, दिघा, घणसोली, आणि गोठेघर या परिसरात आहेत. किंमती फक्त 14 लाखांपासून सुरू होत आहेत.
कुठे किती घरं, किती किंमत? (प्रोजेक्टनुसार यादी)
1. बीकेएस गॅलेक्सी, दिघा
- गट: अत्यल्प उत्पन्न (EWS)
- घरं: 112
- किंमत: ₹18.59 लाख
- क्षेत्रफळ: 29.10 चौ. मी.
- अर्ज फी + अनामत: ₹5,590
हेही वाचा – Coldplay च्या कॉन्सर्टमध्ये रंगेहाथ पकडले गेले CEO आणि HR! व्हायरल व्हिडीओ पाहून पत्नीने…
2. पिरॅमिड डेव्हलपर्स, नेरुळ
- गट: अल्प उत्पन्न (LIG)
- घरं: 18
- किंमत: ₹23-30 लाख
- क्षेत्रफळ: 42.44 – 54.59 चौ. मी.
- अर्ज फी + अनामत: ₹10,590
3. डीपीव्हीजी व्हेंचर्स, सानपाडा
- गट: EWS (2 घरं), LIG (17 घरं)
- किंमत: ₹14-24 लाख
- क्षेत्रफळ: 29.06 – 49.91 चौ. मी.
- अर्ज फी: ₹5,590 (EWS), ₹10,590 (LIG)
4. निलकंठ इन्फ्राटेक, घणसोली
- गट: LIG
- घरं: 18 + 21 = 39
- किंमत: ₹16-28 लाख
- क्षेत्रफळ: 32.52 – 46.22 चौ. मी.
- अर्ज फी: ₹10,590
5. कामधेनु ग्रँड्युअर, सानपाडा
- गट: LIG
- घरं: 17
- किंमत: ₹23-28 लाख
- क्षेत्रफळ: 42.32 – 49.92 चौ. मी.
- अर्ज फी: ₹10,590
6. गोठेघर, नवी मुंबई
- गट: LIG
- घरं: 88
- किंमत: ₹36-37 लाख
- क्षेत्रफळ: 47.85 चौ. मी.
- अर्ज फी: ₹10,590
MHADA लॉटरी 2025 साठी अर्ज कसा करावा?
- अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
- इच्छुकांनी MHADA च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा.
- प्रत्येक गटासाठी अनामत रक्कम व वेगवेगळ्या शुल्काची अट आहे.
कोणासाठी योग्य?
- अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिक
- नवी मुंबईत बजेटमध्ये घर शोधणारे
- पहिलं घर घेणाऱ्यांसाठी ‘गोल्डन चान्स’
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!