

Asia Cup 2023 IND vs NEP : आज आशिया कप 2023 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात नेपाळने भारताला 231 धावांचे लक्ष्य दिले आहे.
नेपाळसारख्या नवशिक्या संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारताला 48.2 षटके लागली. नेपाळच्या संघाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला आणि 230 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी नेपाळकडून आसिफ शेखने 58 धावा आणि सोमपाल कामीने 48 धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारतीय गोलंदाजांची ही कामगिरी पाहता विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा – Asia Cup 2023 : गौतम गंभीरचे भर मैदानात अश्लील वर्तन, Video व्हायरल!
या सामन्यात भारताचे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि इशान किशन यांनी सोपे झेल सोडले. आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळला 104 धावांत गुंडाळले होते.
दोन्ही संघांची Playing 11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरे, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!