Asia Cup 2023 : मोठी बातमी! ‘या’ तारखेला जाहीर होणार भारतीय संघ

WhatsApp Group

India team for Asia Cup 2023 : आशिया कप संदर्भात भारतीय संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. याबाबत सोमवारी (21 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आशिया चषकानंतर भारतीय संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे विश्वचषक 2023 देखील खेळायचा आहे.

यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघातही विश्वचषक संघाची झलक पाहायला मिळणार आहे. किंवा असे म्हणता येईल की आशिया चषकाच्या भारतीय संघात 2-3 बदलांसह विश्वचषक संघाचीही घोषणा होऊ शकते. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती राहणार आहे.

आशिया कप 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला सामना नेपाळ आणि पाकिस्तान यांच्यात मुलतान येथे होणार आहे. तर अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशपाठोपाठ नेपाळनेही आशिया चषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे.

हेही वाचा – VIDEO : माणसाला दिली डुक्कराची किडनी, व्यवस्थित करतेय काम! डॉक्टर म्हणाले…

2 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना

यावेळी आशिया चषक हायब्रीड मॉडेलच्या आधारे होणार आहे. आशिया चषकाच्या यजमान संघाचे फक्त 4 सामने पाकिस्तानात होतील, तर फायनलसह उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. भारतीय संघ 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

यानंतर भारताचा दुसरा गट सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळशी होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एकाच गट-अ मध्ये आहेत. भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला तर ते या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळतील. यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होत आहे. अशा स्थितीत विश्वचषकाच्या दृष्टीने इतके सामने खेळणे संघासाठी चांगले ठरेल.

आशिया चषक स्पर्धेतील दोन गट

  • गट-अ: भारत, पाकिस्तान आणि नेपाळ.
  • गट-ब: श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment