

IPL 2023 Akash Madhwal Records : मुंबई इंडियन्सचा आकाश मधवाल 24 मे रोजी लखनऊविरुद्धच्या सामन्याचा सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला. आकाशने साडेतीन षटकांत 5 धावा देत 5 बळी घेतले. अशा प्रकारे त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आकाश मधवाल (29) हा उत्तराखंडमधील रुरकी येथील धांडेरा येथील असून तो ऋषभ पंतचा शेजारी आहे.
आकाशचा आयपीएलचा डेब्यू सीझन आहे. 3 मे 2023 रोजी, त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध पहिला IPL सामना खेळला. आकाशने आतापर्यंत 7 आयपीएल सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने फर्स्ट क्लास, लिस्ट ए आणि टी-20 मध्ये एकूण 67 विकेट घेतल्या आहेत.
13 वर्षे जुना विक्रम मोडला
आयपीएलमधील प्लेऑफ सामन्यात पाच विकेट घेणारा आकाश मधवाल पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी, डग बोलिंगरने 2010 च्या प्लेऑफ किंवा बाद फेरीत (उपांत्य फेरी) 13 धावांत 4 बळी घेतले, ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.
5️⃣/5️⃣ 𝙞𝙣 𝙩𝙝𝙚 𝙀𝙡𝙞𝙢𝙞𝙣𝙖𝙩𝙤𝙧 – Akash Madhwal becomes the first-ever bowler to take a five-wicket haul in IPL Playoffs.#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/GjBLD61Njb
— Mumbai Indians (@mipaltan) May 24, 2023
आयपीएल प्लेऑफमधील सर्वोत्तम गोलंदाजी
5/5 – आकाश मधवाल (MI) वि LSG, चेन्नई, 2023
4/13 – डग बोलिंगर (CSK) विरुद्ध डेक्कन चार्जर्स, मुंबई DY पाटील, 2010 SF
4/14 – जसप्रीत बुमराह (MI) विरुद्ध DC, दुबई, 2020 Q1
4/14 – धवल कुलकर्णी (GL) विरुद्ध RCB, बेंगळुरू, 2016 Q1
अनिल कुंबळेची बरोबरी
आकाश मधवालने पाच धावा देत विकेट्स घेतल्या. आयपीएलमधील ही सर्वात स्वस्त पाच विकेट्स आहे. याआधी अनिल कुंबळेने 2009 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धही 5 धावांत 5 बळी घेतले होते.
Ayush Badoni 🙌
Nicholas Pooran 😯Two outstanding deliveries from Akash Madhwal to get two BIG wickets 🔥🔥#LSG 75/5 after 10 overs
Follow the match ▶️ https://t.co/CVo5K1wG31#TATAIPL | #Eliminator | #LSGvMI pic.twitter.com/smlXIuNSXc
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
हेही वाचा – IPL 2023 : कोण आहे मुंबई इंडियन्सचा ‘इंजिनिअर’ आकाश मधवाल?
Rohit Sharma & MI scouting department have produced an absolute gem in the form of Akash Madhwal.
The Gratitude. The Respect. The Admiration. This is how you pay back your GURU. Disgustingly, some venomous snakes like Hardik Pandya could never relate. pic.twitter.com/tgPJoN96mH
— S. (@pullshotx45) May 24, 2023
IPL मध्ये सर्वोत्तम इकॉनॉमी रेटसह 5 विकेट्सचा विक्रम
5/5 (इकॉनॉमी रेट: 1.4) – आकाश मधवाल (MI) वि LSG, चेन्नई, 2023
5/5 (इकॉनॉमी रेट: 1.57) – अनिल कुंबळे (आरसीबी) वि आरआर, केप टाऊन, 2009
5/10 (इकॉनॉमी रेट: 2.50) – जसप्रीत बुमराह (MI) वि केकेआर, मुंबई डीवाय पाटील, 2022
सलग चार विकेट घेणारा मुंबईचा दुसरा गोलंदाज
आता मधवालही आयपीएलमध्ये सलग चार किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. त्याने शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चार विकेट घेतल्या होत्या. 2012 मध्ये मुनाफ पटेलने असाच पराक्रम केला होता. आयपीएलमध्ये सलग चार विकेट घेणारा तो मुंबईचा दुसरा खेळाडू आहे.
आयपीएलमधील अनकॅप्ड खेळाडूची सर्वोत्तम गोलंदाजी
आकाश मधवालने अनकॅप्ड खेळाडू म्हणून केलेला पराक्रम गोलंदाजीच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे ज्याने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
5/5 – आकाश मधवाल (MI) वि LSG, चेन्नई, 2023
5/14 – अंकित राजपूत (KXIP) वि SRH, हैदराबाद, 2018
5/20 – वरुण चक्रवर्ती (KKR) विरुद्ध DC, अबू धाबी, 2020
5/25 – उमरान मलिक (SRH) विरुद्ध GT, मुंबई वानखेडे, 2022
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!