

T20 World Cup 2022 IND vs PAK : टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपमध्ये आपले मिशन सुरू केले आहे. मेलबर्न येथे सुरू असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या यांनी तिखट वेगवान मारा करत पाकिस्तानला २० षटकात ८ बाद १५९ धावांवर रोखले.
पाकिस्तानचा डाव
पाकिस्तानची सुपरहिट ओपनिंग जोडी मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम टीम इंडियाच्या युवा अर्शदीप सिंगपुढे नतमस्तक झाले. अर्शदीपने आपल्या पहिल्या वर्ल्डकपच्या पहिल्या चेंडूवर बाबरला शून्यावर पायचीत पकडले. अर्शदीपने रिझवानला भुवनेश्वकरवी झेलबाद केले. त्यानंतर शाद मसुद आणि इफ्तिखार अहमद यांनी अर्धशतके ठोकत पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. अहमदने २ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. आक्रमक झालेल्या अहमदला मोहम्मद शमीने १३व्या षटकात पायचीत पकडले. हैदर अली, आसिफ अली हे फलंदाज खास कामगिरी करू शकले नाही. पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप आणि हार्दिकने प्रत्येकी ३ बळी घेतले.
Innings Break!
Three wickets apiece for @hardikpandya7 & @arshdeepsinghh and a wicket each for @BhuviOfficial & @MdShami11 as Pakistan post a total of 159/8 on the board.
Scorecard – https://t.co/X970NaDN4n #INDvPAK #T20WorldCup pic.twitter.com/Nypo6k5ZRn
— BCCI (@BCCI) October 23, 2022
हेही वाचा – IND Vs PAK : भारतीय चाहते ‘लुंगी डान्स’ गाण्यावर थिरकले..! आनंद महिंद्रांनी शेअर केला Video
दोन्ही संघांची Playing 11 :
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!