

IND vs PAK Pakistani Fan Waving Flag Video : मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऐतिहासिक सामना झाला. टी-२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या अप्रतिम खेळामुळे हा सामना रोमांचक झाला, तसेच या सामन्याचे अनेक क्षण सोशल मीडियावर व्हायरलही झाले. यापैकी एक क्षण आला जेव्हा एका भारतीयाने स्टेडियममध्ये एका पाकिस्तानी चाहत्याला ट्रोल केले आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडिओमध्ये काय?
एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे, असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ २३ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्याचा आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान एक पाकिस्तानी चाहता आपला झेंडा फडकावत आहे. पण तो ध्वज उलटा फडकवत आहे, यादरम्यान एका भारतीय प्रेक्षकाने त्या व्यक्तीला ध्वज उलटा धरल्याची वारंवार आठवण करून दिली. गर्दी आणि आवाजामुळे त्याला ऐकू येत नव्हते, पण पुन्हा पुन्हा बोलल्यावर त्याला आपली चूक कळली. पाकिस्तानी चाहत्याने आपला झेंडा उचलताच भारतीय चाहते हसायला लागले आणि लगेच म्हणाले, ”आणि यांना काश्मीर हवे आहे”. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला.
हेही वाचा – भारताशी नाळ असलेला माणूस ब्रिटनचा पंतप्रधान..! आनंद महिंद्रांची ‘भारी’ प्रतिक्रिया
और इन्हें #kashmir #कश्मीर चाहिए 😂 pic.twitter.com/ITwv5rUcjJ
— Dipanshu Kabra (@ipskabra) October 24, 2022
असा रंगला सामना…
विराट कोहली (नाबाद ८२) आणि हार्दिक पंड्या (४०) यांच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेटमध्ये टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ गटातील सामन्यात पाकिस्तानला ४ गड्यांनी हरवले. यासोबतच गेल्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा बदलाही भारताने घेतला. पाकिस्तानच्या ८ बाद १५९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा करत लक्ष्याचा पाठलाग केला. पाकिस्तानकडून हारिस रौफ आणि मोहम्मद नवाजने प्रत्येकी दोन, तर नसीम शाहने एक विकेट घेतली.