

Dawood In Indian Team Dressing Room : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर २५ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तपास यंत्रणेनं दाऊदच्या गुंडांवर बक्षीसही ठेवलं आहे. एनआयएनं या वर्षी ३ फेब्रुवारीला एफआयआर नोंदवला होता. यामध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अनीस इब्राहिम, जावेद चिकना आणि टायगर मेमन यांच्यावर शस्त्रास्त्रांची तस्करी, नार्को दहशतवाद, अंडरवर्ल्ड क्रिमिनल सिंडिकेट, मनी लाँड्रिंग याशिवाय चुकीच्या पद्धतीनं जमीन बळकावण्याचे आरोप आहेत. जैश आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचाही एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. आता याप्रकरणी एनआयएनं या सर्व कुख्यात दहशतवाद्यांवर इनाम जाहीर केलं आहे. दाऊद इब्राहिमवर २५ लाख, छोटा शकीलवर २० लाख, तर अनीस इब्राहिम, जावेद चिकना आणि टायगर मेमनवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये दाऊद
एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये अनेक दशकांपासून भीतीचं दुसरं नाव असलेला दाऊद इब्राहिम आज कोणत्या गुहेत लपला आहे हे माहीत नाही? पण एके काळी त्याला क्रिकेट बघण्याचाही नाद होता. याशिवाय त्याचं नाव मॅच फिक्सिंग आणि इतर काळ्या फिक्सिंग व्यवसायातही अनेकदा आलं. त्याचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. दाऊद एकदा १९८७ मध्ये शारजाहमधील भारतीय ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला होता. या घटनेची कबुली दोन माजी भारतीय कर्णधारांनीही केली होती. काही वर्षांनंतर, कपिल देव आणि दिलीप वेंगसरकर यांनीही कबूल केलं की शारजाहमधील भारतीय ड्रेसिंग रूममध्ये एक व्यापारी म्हणून प्रवेश केलेला माणूस दुसरा कोणी नसून डॉन दाऊद इब्राहिम होता.
The National Investigation Agency (NIA) has announced a cash reward of ₹25 lakh on underworld gangster Dawood Ibrahim and for his associates in a probe related to the ‘D’ Company. #DawoodIbrahim pic.twitter.com/tAuv5fOWL3
— Manish Shukla (@manishmedia) September 1, 2022
हेही वाचा – टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियानं साधला ‘डाव’; भारताविरुद्ध खेळणार ‘मुंबई’चा खेळाडू!
या घटनेवर जळगावात एका कार्यक्रमात बोलताना दिलीप वेंगसरकर म्हणाले, की दाऊद म्हणाला होता, ”तुम्ही स्पर्धा जिंकली तर मी तुम्हा सर्वांना टोयोटा कार देईन”. ही ऑफर संपूर्ण संघानं नाकारली होती. एका संभाषणात कपिल म्हणाला, “होय, मला आठवतंय की शारजाहमधील आमच्या ड्रेसिंग रूममध्ये एक माणूस आला होता, त्याला खेळाडूंशी बोलायचं होतं. पण मी त्याला खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाला भेटू देण्याची त्याची ऑफर नाकारली होती.” याशिवाय बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांनीही त्यांच्या ‘आय वॉज देअर – मेमोयर्स ऑफ अ क्रिकेट अॅडमिनिस्ट्रेटर’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे.
काय होती दाऊदची ऑफर!
आपल्या पुस्तकाच्या त्यांनी लिहिलं, की, दुबईचा व्यापारी म्हणून ड्रेसिंग रूममध्ये आलेल्या दाऊदनं सांगितलं, की “जर भारतीय संघ इथं चॅम्पियन झाला तर मी येथील अधिकाऱ्यांसह संघातील प्रत्येक सदस्याच्या घराच्या दारावर टोयोटा उभी करेन. दाऊदनं जयवंत लेले आणि तत्कालीन भारतीय संघ व्यवस्थापक ज्ञानेश्वर आगाशे यांना शारजाहमधील श्रीमंत उद्योगपतीला भेटण्यास सांगितलं.
हेही वाचा – भारताचे ‘रॉकीभाई’ गौतम अदानी सुसाट..! बनले जगाचे तिसरे श्रीमंत व्यक्ती; ‘अशी’ वाढलीय कमाई!
जयवंत लेले यांनी लिहिलं, ”बऱ्याच कालावधीनंतर आम्हाला कळले की आम्ही शारजाहमध्ये १९८७ मध्ये भेटलो तो दाऊद इब्राहिम होता, जो १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड होता.” त्यावर्षी शारजाह चषक स्पर्धेत भारताचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या चांगल्या धावगतीच्या जोरावर चॅम्पियन घोषित करण्यात आलं. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारताचे समान गुण होते.