

Chandrayaan-3 Landing : भारताचे चांद्रयान-3 मिशन यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता, चांद्रयान-3 चे विक्रम लँडर रोव्हरसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. प्रत्येक भारतीय या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता. चांद्रयान-3 च्या लँडिंगबाबत प्रत्येक भारतीयामध्ये उत्सुकता होती. सध्या आयर्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट सघही हे प्रक्षेपण पाहत होता. आज आयर्लंडविरुद्ध भारत तिसरा टी-20 सामना खेळणार आहे. चांद्रयान-3 चंद्रावर उतरताच टीम इंडियाच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवत आनंद साजरा केला. त्याचा व्हिडिओ BCCI ने शेअर केला आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. यासोबतच चंद्रावर आपले रोव्हर उतरवण्याचा पराक्रम करणारा जगातील चौथा देश ठरला आहे. भारतापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने मिशन मून राबवले आहे.
हेही वाचा – Chandrayaan-3 Landing : भारताचा विक्रम! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा ठरला पहिला देश
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. चांद्रयान-3 मिशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर पी वीरामुथुवेल म्हणाले, “चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ जाणारा आपण पहिला देश बनलो आहोत.”
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम मोदी म्हणाले, ”पूर्वी ‘चंदा मामा दूर के’ असे म्हटले जात होते, आता ‘अब चंदा मामा एक टूर के हैं’ असे म्हटले जाईल. यासोबतच त्यांनी सांगितले की, लवकरच इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 मिशन सुरू करणार आहे. हा दिवस देशाच्या कायम स्मरणात राहील. पराभवातून बोध घेऊन विजय कसा मिळवला जातो याचे प्रतीक हा दिवस आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!