World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये खळबळ, नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा पाडाव!

WhatsApp Group

World Cup 2023 SA vs NED In Marathi : स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या नेदरलँड्स संघाने वर्ल्डकप 2023 मध्ये इतिहास रचला आहे. धर्मशालावर झुंजार लढाऊ बाणा दाखवत नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला 38 धावांनी पराभवाचे पाणी पाजले. या विजयासह वर्ल्डकपच्या गुणतालिकेत रंगत आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कप्तान टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून नेदरलँड्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना 2 तास उशिरा सुरू झाला आणि 50 ऐवजी 43-43 षटकांचा करण्यात आला. कर्णधार स्कॉट एडवर्डच्या 78 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर नेदरलँड्सने 8 गडी गमावून 245 धावा केल्या.

नेदरलँड्सचे अफलातून कमबॅक (SA vs NED)

प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने एका वेळी अवघ्या 82 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर नेदरलँडचा संघ केवळ 150 धावाच करू शकेल असे वाटत होते, परंतु स्कॉट एडवर्ड्स आणि रॉल्फ व्हॅन डर मर्वे यांनी आठव्या विकेटसाठी 64 धावांची खेळी करत संघाचा डाव फिरवला. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 69 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 78 धावा केल्या. तर रॉल्फ व्हॅन डर मर्वेने 19 चेंडूत 29 धावांची तर आर्यन दत्तने 9 चेंडूत 23 धावांची नाबाद खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जान्सेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

हेही वाचा – World Cup 2023 : पाकिस्तानी खेळाडूंची तब्येत बिघडली, अनेकांना ताप!

आफ्रिेकेचा डाव गडगडला! (World Cup 2023 SA vs NED)

प्रत्युत्तरात नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. आफ्रिकेने 44 धावांवर 4 तर दीडशे धावांच्या आत 8 विकेट्स गमावल्या. कप्तान टेम्बा बावुमा (16) इन फॉर्म क्विंटन डी कॉक (20) स्वस्तात बाद झाले. आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. नेदरलँड्सकडून फिरकीपटू रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, पॉल व्हॅन मीकरेन यांनी कमी धावा देत गोलंदाजी केली आणि ठराविक अंतरावर संघाला विकेट्स काढून दिल्या. केशव महाराजने 40 धावांची खेळी केली, पण ती विजय मिळवून देण्यात अपुरी ठरली. आफ्रिकेचा डाव 42.5 षटकात 207 धावांवर संपुष्टात आला. नेदरलँड्सकडून बीकने सर्वाधिक 3 तर मर्वे, लीड आणि मीकरेन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment