चीनचं टॉयलेट बनलं ‘टूरिस्ट हॉटस्पॉट’, पाहिलं की तुम्हीही फोटो काढायला लावाल!

WhatsApp Group

China Tourist Toilet : चीनमधील गांसु प्रांतातील डूनहुआंग नाईट मार्केटमधील एक नव्याने बांधलेलं सार्वजनिक शौचालय सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सामान्यतः शौचालय म्हणजे केवळ गरज भागवण्यासाठीच असते, पण इथलं हे ‘डूनहुआंग प्योर रियल्म पब्लिक कल्चरल स्पेस’ नावाचं टॉयलेट एखाद्या पर्यटक आकर्षणाप्रमाणे बनलं आहे.

दूरदूरून लोक या अनोख्या टॉयलेटचं सौंदर्य पाहण्यासाठी येत आहेत आणि त्याच्यासोबत फोटोही काढत आहेत. हे टॉयलेट केवळ अत्याधुनिक नव्हे, तर डूनहुआंग संस्कृतीच्या भित्तीचित्रांनी सजवलेलं आहे आणि युनेस्कोच्या यादीतील मोगाओ गुंफा आणि सिल्क रोड शहरातील वारसा जपून तयार करण्यात आलं आहे.

काय आहे खास?

या दोन मजली शौचालयात अनेक वैशिष्ट्यं आहेत जी तुम्हाला चकित करतील:

  • भित्तीचित्र (Murals): डूनहुआंगच्या ऐतिहासिक कला आणि संस्कृतीवर आधारित सुंदर पेंटिंग्ज.
  • “Imaginary Realm” फ्लोअर: वरील मजल्यावर एक संकल्पनात्मक जागा जी एखाद्या गॅलरीसारखी भासते.
  • Ultra-clear काचेची भिंत: बाहेरील भाग पारदर्शक काचेने झाकलेला आहे, ज्यामुळे दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी आकर्षक दृश्य मिळते.
  • मदर-बेबी रूम: एंटी-बॅक्टेरियल नर्सिंग टेबल, चाइल्ड सेफ्टी सीट्स आणि ऑटो-क्लीनिंग सिस्टम.
  • प्रवाशांसाठी सुविधा: बसायला जागा, पिण्याच्या पाण्याचा डिस्पेंसर, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ शौचालय.

टूरिस्ट्सच्या प्रतिक्रिया

16 ऑगस्ट रोजी उघडलेल्या या शौचालयाने अल्पावधीतच पर्यटकांचं लक्ष वेधून घेतलं. अनेक पर्यटक हानफू (Hanfu – पारंपरिक चीनी पोशाख) घालून फोटो काढायला येत आहेत.

हेही वाचा – EMI बाऊन्स झाला, तर तुमचा मोबाईल ‘लॉक’ होणार! RBI चा नवा नियम…

एक महिला म्हणाली, “मी नाईट मार्केटमध्ये टॉयलेट शोधत होते आणि वाटलं मी चुकून एखाद्या गुंफेत शिरले आहे!”

एका पर्यटकाने सांगितलं, “टॉयलेटमध्ये किती वेळ घालवलाय हे बाहेर स्क्रिनवर दाखवलं जातं. जर तुम्ही पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ शौचालयात राहिलात, तर स्क्रीनचा रंग बदलून इशारा दिला जातो!”

हे टॉयलेट का बनलं ‘ट्रेंडिंग’?

सामान्यतः टॉयलेट म्हणजे सार्वजनिक सोयीसाठीची जागा असते. पण चीनने ही संकल्पना नवी उंची दिली आहे. डूनहुआंगच्या सांस्कृतिक वारशाला ध्यानात घेऊन शौचालयालाही कला-संवेदनशीलतेने बनवलं आहे.

हे केवळ एक शौचालय नाही, तर पर्यटन, संस्कृती, आणि भविष्याचा संगम आहे!

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment