

World Longest Lightning Flash Record : जगात अशा अनेक नैसर्गिक घटना घडतात ज्या विज्ञानालाही हादरवून टाकतात. अशीच एक घटना म्हणजे ८२९ किलोमीटर लांब वीज चमकण्याची – इतिहासातील सर्वात लांब वीज चमक (Mega Flash). विशेष म्हणजे ही वीज एका देशात नाही, तर तब्बल तीन देशांइतक्या अंतरापर्यंत पसरली होती!
ही घटना २२ ऑक्टोबर २०१७ रोजी अमेरिकातील टेक्सास ते कॅन्सास सिटी दरम्यान घडली होती. या घटनेची अधिकृत नोंद आता WMO (World Meteorological Organization) या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेने केली आहे.
BREAKING: A single lightning bolt just broke all records!
— EBNW Story (@EBNWStory) August 1, 2025
Known as a "Megaflash", it stretched 829 KM (515 miles) from Texas to Missouri and lasted 7.39 seconds!
Nature just reminded us who's boss. #Megaflash #LightningStrike #WeatherUpdate #WorldRecord #NaturePower #USA pic.twitter.com/8y6RToWeNP
किती मोठा होता हा मेगाफ्लॅश?
८२९ किलोमीटर म्हणजे अंदाजे दिल्ली ते भोपाळपेक्षा अधिक अंतर! आधीचा विक्रम होता ७६८ किमीचा, जो २९ एप्रिल २०२० रोजी अमेरिकेच्या मिसिसिपी ते टेक्सास दरम्यान घडला होता. आता तो विक्रम मागे पडला आहे.
हेही वाचा – मंत्री साहेब ‘रम्मी’ खेळताना पकडले गेले…, सरकारने दिली ‘खेळ’ विभागाची जबाबदारी!
या चमकत्या विजेच्या वेळी अनेक मोठे फ्लॅशेस पाहायला मिळाले. वैज्ञानिकांनी पुन्हा डेटा विश्लेषण करताना लक्षात घेतले की २०१७ मधील एक फ्लॅश आधी दुर्लक्षित झाला होता, जो प्रत्यक्षात जागतिक विक्रम मोडणारा मेगाफ्लॅश होता!
“आकाश फाडणारी” वीज – धोकादायक व भयानक
WMO चे तज्ज्ञ रँडल सर्वेनी म्हणतात, “वीज अनेकदा वादळाच्या जागेपासून खूप लांबपर्यंत पोहोचते. त्यामुळेच इंग्रजीत ‘Bolt from the blue’ असं म्हटलं जातं.” ही घटना चौकस करणारीच नाही, तर धोकादायकही आहे.
WMO प्रमुख सेलेस्ट साओलो यांनी म्हटलं, “जगभरात २०२७ पर्यंत प्रत्येक नागरिकाला आधुनिक हवामान इशारा प्रणालीशी जोडण्याचा आमचा संकल्प आहे. वीज एखादी थरारक गोष्ट वाटत असली, तरी प्रत्येक वर्षी जगभरात अनेकांचे जीव घेणारी ही एक विनाशकारी शक्तीही आहे.
आत्तापर्यंतचे वीजसंबंधी इतर तीन जागतिक विक्रम:
- सर्वात लांब वेळ वीज चमकली : १७.१०२ सेकंद, १८ जून २०२० (उरुग्वे आणि अर्जेंटिना)
- एकाच विजेने सर्वाधिक अप्रत्यक्ष मृत्यू: इजिप्त, १९९४ – ४६९ जणांचा मृत्यू (तेल साठ्यात स्फोट)
- एकाच स्ट्राइकमधील सर्वाधिक मृत्यू: झिंबाब्वे, १९७५ – २१ जणांचा मृत्यू एका झोपडीवर वीज पडून
उपग्रहाच्या साह्याने मिळालं सत्य
२०१६ पासून वीज मॅपिंग उपग्रहाद्वारे सुरू झाली आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर वीज डेटा मिळू लागला. Severe Storms Research Centerचे शास्त्रज्ञ मायकेल पीटरसन म्हणतात, “जसजसे डेटा वाढत जातील, तसतशा अजूनही अविश्वसनीय विजेच्या घटना आपल्याला दिसतील.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!