Viral Video : श्रीमंत लोकांच्या पार्टीत काय चालतं? गायब झालेल्या युवतीचे आरोप ऐकून अंगावर काटा येईल!

WhatsApp Group

Gabriela Rico Jimenez Case : मेक्सिकोतील एका २१ वर्षीय युवतीचा २००९ मधील बेपत्ता होण्याचा गूढ प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे. गॅब्रिएला रिको जिमेनेझ नावाच्या या तरुणीने एका आलिशान हॉटेलमधून किंचाळत बाहेर येत, श्रीमंत व प्रभावशाली लोक माणसांना खातात, खून करतात, असे धक्कादायक आरोप केले. काही मिनिटांतच पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर ती रहस्यमयरीत्या गायब झाली.

हा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे कारण ‘Mexico Unexplained’ या पॉडकास्टमध्ये या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा पॉडकास्ट सध्या Apple Podcasts वर उपलब्ध आहे आणि पुन्हा एकदा या प्रकरणावरील तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

२००९ मधील व्हायरल व्हिडिओ

गॅब्रिएलाचा भावूक आणि अटक होण्याचा व्हिडिओ २००९ मध्ये स्पॅनिश न्यूज चॅनेलवर दाखवला गेला. यात ती जोरजोरात ओरडत होती, “मला माझं स्वातंत्र्य हवंय! मला जबरदस्तीने कैदेत ठेवलं आहे!” तिने मेक्सिकोतील सर्वात श्रीमंत घराण्यातील कार्लोस स्लिम डॉमिट यांचं नाव घेत, त्यांना या कटकारस्थानाची माहिती असल्याचा दावा केला.

हेही वाचा – लॉरेंस बिश्नोईची उघड धमकी, ‘गोळी छातीत घालू!’ कपिल शर्माचा गुन्हा काय?

राजकारणी व सेलिब्रिटींची नावं

गॅब्रिएलाने केवळ व्यावसायिकांचंच नव्हे, तर उच्चपदस्थ राजकारण्यांचंही नाव घेतलं. तिने जुआन कॅमिलो मौरिन्यो या तत्कालीन गृहमंत्र्याच्या मृत्यूबाबत पोलिसांवर आरोप केला. मौरिन्यो यांचा २००८ मध्ये मेक्सिको सिटीतील विमान अपघातात मृत्यू झाला होता.

 भयानक आरोप – “ते माणसं खातात!”

सगळ्यात धक्कादायक दावा म्हणजे, गॅब्रिएलाने हॉटेलमधून किंचाळत सांगितलं, “ते माणसं खातात! माणसाच्या मांसाचा वास येतो! मला खून माहीत होते, पण माणसं खातात हे नाही!”

या वेळी पोलिसांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती आक्रमकपणे विरोध करत राहिली, “तुम्ही मला नेणार नाही जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही!” शेवटी तिला बख्तरबंद वाहनात बसवून नेण्यात आलं आणि त्यानंतर ती कुठेच दिसली नाही.

१५ वर्षांनंतरही अनुत्तरित प्रश्न

आज १५ वर्षांनंतरही, गॅब्रिएला रिको जिमेनेझ जिवंत आहे की मृत, हे कुणालाच ठाऊक नाही. तिचे आरोप खरे होते का, की मानसिक अस्थिरतेतून हे घडलं, यावर अजूनही पडदा आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment