Video : वैज्ञानिकांनी बनवलेलं चमत्कारी कृत्रिम हृदय, 8 दिवस जिवंत राहिला रुग्ण!

WhatsApp Group

Titanium Artificial Heart : वैद्यकीय विज्ञानाने आणखी एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांच्या टीमने प्रथमच टायटॅनियमने बनवलेलं एक कृत्रिम हृदय (Artificial Heart) यशस्वीपणे एका 58 वर्षीय रुग्णामध्ये प्रत्यारोपित केलं आणि या कृत्रिम हृदयाने तब्बल 8 दिवस प्रभावीपणे काम केलं. त्यानंतर संबंधित रुग्णाला मानवी हृदय प्रत्यारोपित करण्यात आले.

टायटॅनियमपासून बनलेलं ‘Future Heart’

हे अनोखं हृदय अमेरिकेच्या टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूट (Texas Heart Institute) मधील बायवेकर (BiVACOR) या मेडिकल डिव्हाइस कंपनीने विकसित केलं आहे. टायटॅनियम सारख्या मजबूत आणि टिकाऊ धातूपासून तयार केलेलं हे हृदय एक मिनिटात 12 लिटर रक्त पंप करू शकतं. विशेष म्हणजे, या डिव्हाइसमध्ये कोणतेही पारंपरिक झडप किंवा स्प्रिंग्स नाहीत, तर फक्त चुंबकीय रोटर मूव्हमेंट चा वापर करण्यात आला आहे.

बाह्य कंट्रोलरची व्यवस्था

या हृदयासोबत एक लहानसा कंट्रोलर रुग्णाच्या पोटावर बसवला जातो, जो बाहेरून संपूर्ण प्रणालीवर नियंत्रण ठेवतो. यामुळे डॉक्टरांना हृदयाची कार्यक्षमता सतत तपासता येते आणि आवश्यक त्या सुधारणा करता येतात.

हेही वाचा – रवी शास्त्री काय ओरडले म्हणे? व्हिडीओ होतोय व्हायरल; इंग्रजीत एवढं बोलले की सगळे गप्प!

भविष्यातील क्रांतीची नांदी

हे यंत्र केवळ एक प्रयोग नाही, तर भविष्यातील हृदय प्रत्यारोपण पद्धतीत एक क्रांती ठरू शकतं. या कृत्रिम हृदयावर गेल्या 10 वर्षांपासून संशोधन सुरू होतं आणि आता अंतिम चाचणीच्या टप्प्यावर आहे. ही प्रणाली जर मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली, तर हृदय डोनरच्या टंचाईवर मात करता येईल आणि लाखो रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

वैद्यकीय क्षेत्रात नवचैतन्य

या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्राला एक नवीन दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे. हृदयाच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना नवसंजीवनी देण्याचं हे उपकरण भविष्यातील वैद्यकीय उपकरणांची झलक आहे. हृदय प्रत्यारोपण अधिक प्रभावी, सुरक्षित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी हे एक मोठं पाऊल आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment