Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी कधीच खाऊ नयेत 'ही' 5 फळं!

मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहाराविषयी अनेक प्रश्न आणि चिंता असतात कि त्यांनी त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि कोणत्या गोष्टी वगळल्या पाहिजेत.

कारण डायबिटीजमध्ये खाण्यामध्ये थोडासा निष्काळजीपणाही रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकतो.त्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

सर्वसाधारणपणे फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की अशी 5 फळे आहेत जी मधुमेहाच्या रुग्णांना फायद्याऐवजी हानी पोहोचवू शकतात. ही फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. 

चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती फळे आहेत जी मधुमेहाच्या रुग्णांनी खाणे टाळावे.

साखरेचे प्रमाण जास्त असण्यासोबतच अननसमध्ये कार्बोहाइड्रेटही जास्त असते. एका मध्यम आकाराच्या अननसात 40 ग्रॅम साखर असते. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांनी ते खाणे टाळावे. हे फळ खाल्ल्याने साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

लिचीमध्ये केवळ साखरच नाही तर उच्च ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे. ज्यामुळे शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी लगेच वाढू शकते. 

लिचीप्रमाणेच केळीमध्येही ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्याचे अतिसेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. केळीमध्ये साधे कार्ब्स आणि पटकन पचण्याजोगे फायबर असल्यामुळे ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. त्यामुळे मधुमेह असंतुलित होतो. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांना केळी न खाण्याचा सल्ला दिला जातो.

चिकू हे अतिशय गोड फळ आहे. चिकू खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढते. मधुमेही रुग्णांनी चिकू खाऊ नये.

मधुमेहाच्या रुग्णांनीही सुके खजूर खाणे टाळावे. त्यात आधीच नैसर्गिक साखर असते जी कोरडे झाल्यानंतर आणखी वाढते. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनी ते खाणे टाळावे.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी