चरबी घालवण्यासाठी 5 ड्रिंक्स, रोज सकाळी प्याल तर आठवडयात बारीक व्हाल!

हळदीचे पाणी 

हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे  शरीरातील जळजळ कमी करून वजन कमी करण्यास मदत करतात. गरम पाण्यात हळद आणि थोडे मध किंवा लिंबू मिसळून तुम्ही हे पिऊ शकता. 

ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर तुमची भूक कमी करण्यास आणि चयापचय वाढवण्यास मदत करते. ऍपल सायडर व्हिनेगर पाणी, मध आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी प्यायल्याने तुमच्या शरीरातील जळजळ कमी होते. तसेच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास देखील मदत करते.

दालचिनीचे पाणी

सकाळी दालचिनीचे पाणी प्यायल्याने पोटाची हट्टी चरबी कमी होते. दालचिनीमध्ये अनेक आरोग्य फायदे आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत.या रेसिपीसाठी तुम्ही दालचिनीच्या संपूर्ण काड्या किंवा दालचिनी पावडर वापरू शकता.

आल्याचे पाणी

आल्यामध्ये झिंजेरॉन आणि शोगोल नावाची दोन संयुगे जास्त प्रमाणात असतात, जे दररोज खाल्ल्यास पोटाची हट्टी चरबी जाळण्यास मदत होते. सर्वोत्तम परिणामांसाठी, फक्त एक इंच आले कापून किंवा किसून घ्या, पाण्यात टाका आणि उकळा. तुम्ही तुमच्या नेहमीच्या सकाळच्या चहामध्ये आले घालू शकता.

चिया सीड्सचे पाणी

सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. चियाच्या सीड्समध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे आम्लपित्त, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्यांपासून आराम मिळतो.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी