खराब मूड चांगला करायचाय? 'या' 5 फळांचा डाएटमध्ये करा समावेश!

कामाच्या वाढत्या ताणामुळे अनेकदा ऑफिस वेळेनंतरही लोकांना काम करावे लागते. सतत काम आणि आरोग्याकडे लक्ष न दिल्याने लोकांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. ज्याचा त्यांच्या आरोग्यावर आणि मूडवर परिणाम होतो.

अशा परिस्थितीत तुम्ही फळे आणि पौष्टिक आहाराला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. यामुळे तुमची हार्मोन्सची पातळी योग्य राहते आणि तुमचा मूड खराब होत नाही. 

आपल्या आहारात संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. व्हिटॅमिन सी केवळ रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक नाही तर ते तणाव पातळी कमी करण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

केळीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, या पोषक तत्वांचा तुमच्या मूडवर सकारात्मक प्रभाव पडतो.

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी केवळ स्वादिष्टच नाहीत तर अँटिऑक्सिडंट्सनेही भरपूर आहेत. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करतात,

एवोकॅडोमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे तुमचा मूड सुधारण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने तुम्हाला मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड मिळतात, जे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

लोकांना अननसाची चव खूप आवडते. या फळामध्ये ब्रोमेलेन नावाचे एंजाइम असते, जे त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. यामध्ये असलेले ब्रोमेलेन मेंदूतील सेरोटोनिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. हे तुम्हाला आनंदी बनवते आणि तुमचा मूड सुधारतो.

पुरुषांसाठी लवंग तेलाचे फायदे, ‘या’ 5 समस्यांपासून देते आराम, जाणून घ्या!